Home /News /astrology /

पुन्हा पुन्हा प्रेमात पडता? दोष तुमचा नाही, तुमच्या राशीचा आहे हा प्रभाव

पुन्हा पुन्हा प्रेमात पडता? दोष तुमचा नाही, तुमच्या राशीचा आहे हा प्रभाव

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

राशींमध्ये असणारा प्रेमचा (Love) गुण त्यांच्यासाठी दोषही ठरतो. कारण या राशीच्या व्यक्ती पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात.

    दिल्ली, 16 जून : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)12 राशींचं वेगवेगळं महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे (Zodiac Sing) स्वतःचे स्वभाव गुण असतात. राशीनुसार त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. प्रत्येक राशीची व्यक्ती आयुष्यामध्ये चढ-उतार अनुभवत असते. ग्रहमान बदललं की आयुष्यामध्ये काही बदल देखील घडत असतात. प्रत्येक राशीमध्ये काही गुण असतात तर, काही दोष असतात. मात्र काही राशींमध्ये असणारा प्रेमचा (Love) गुण त्यांच्यासाठी दोषही ठरतो. कारण या राशीच्या व्यक्ती पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात जाणून घेऊयात त्या राशींबद्दल. मिथुन रास या राशी प्रेम भावनेनेबद्दल अतिशय संवेदनशील (Sensitive)असतात. सौंदर्यही त्यांची कमजोरी असते. त्यामुळे लोक जास्त आकर्षित होतात. यांचं मन चंचल असतं. एकाच ठिकाणी त्यांचं मन टिकत नाही. हे लोक पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात. एक रिलेशनशिप (Relationship) खराब झालं तरी टेन्शन घेत नाहीत. (Chanakya Niti: ‘या’ 5 गोष्टी आहेत आर्थिक संकटाचे संकेत) सिंह रास सिंह राशीचे लोक अतिशय व्यवहारी असतात. त्यांचा संपर्क दांडगा असतो. बोलण्यात हे लोक पटाईत असतात. मात्र, हे लोक लवकर एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. त्यामुळेच जास्तवेळा प्रेमामध्ये पडतात. एकदा ब्रेक-अप झालं तरी, दुसऱ्या रिलेशनशिपसाठी तयार असतात. (Chanakya Niti: भीतीमुळे सोडू नका ध्येयाचा पाठलाग; दृढ निश्चय बदलेल आयुष्य) तुळ रास तूळ राशीचे लोक आपल्या जोडीदाराबद्दल प्रचंड ईमानदार असतात. प्रेमाचे नातं एकनिष्ठतेने निभावतात. त्याच्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते मात्र, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आले तर, दुसरं रिलेशनशिप सुरू करताना त्यांना कोणताही प्रॉब्लेम येत नाही. ते अतिशय व्यवहारिकपणे नवीन नातं सुरू करतात. त्यामुळेच यांच्याही आयुष्यात प्रेम जास्त वेळा येत. (साप्ताहिक राशीभविष्य : कोणासाठी उत्तम, कोणासाठी अडचणीचा ठरणार हा आठवडा?) धनु रास धनु राशीची माणसं अतिशय रोमँटिक असतात. त्यामुळे लवकर प्रेमात पडतात मात्र, आपले प्रेमसंबंध निष्ठेने निभावतात. एखाद्या व्यक्तीशी ब्रेकअप झाल्यानंतर त्या व्यक्ती बरोबर ते ओळखही ठेवत नाहीत. मात्र सतत प्रेमात पडतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या