साप्ताहिक राशीभविष्य : कोणासाठी उत्तम, कोणासाठी अडचणीचा ठरणार हा आठवडा?

Horoscope : तुमचं आठवड्याचं राशीभविष्य काय आहे पाहा.

Horoscope : तुमचं आठवड्याचं राशीभविष्य काय आहे पाहा.

  • Share this:
मुंबई, 13 जून : या आठवड्यात शनी वक्री असून मकर राशीत भ्रमण करेल. मंगळ कर्क राशीत आहे आणि शनीबरोबर प्रतियोग करत आहे. सूर्य बुध राहु वृषभ राशीत आणि केतू वृश्चिकेत आहे. गुरू कुंभ राशीत भ्रमण करत आहे. शुक्र मिथुन राशीत असुन रवी 14 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. आज आपण या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू. मेष अश्विनी, भरणी अणि कृत्तिका नक्षत्राचा 1 चरण या राशीत येतात. राशी स्वामी मंगळ आहे. हा आठवडा आपला तापट आणि उतावीळ स्वभाव जर काबूत ठेवला तर सुखात जाईल. आर्थिक नियोजन नीट करा. गृह कलह टाळा. समाजासाठी काही करावं असं वाटेल. तृतीय स्थानात होणारे सूर्यभ्रमण पराक्रमात वाढ करणारे आहे. सप्ताह चांगला आहे. मंगळ उपासना करावी. वृषभ कृत्तिका नक्षत्राचे तीन चरण, रोहिणी, मृग नक्षत्राचे 2 चरण या राशीत येतात. राशी स्वामी  शुक्र आहे. या आठवड्यात राशीतून बाहेर पडणारा रवी ग्रहण योग संपवेल. मन थोडे स्थिर आणि शांत होईल. शुक्राचं धनस्थानातील भ्रमण आर्थिक लाभ  मिळवून देईल. अनावश्यक खर्च  टाळा. डोळ्याचे त्रास जाणवू शकतात. गुरू महाराज घरी आणि कार्य क्षेत्रात मदत करत आहेत. रवी उपासना करावी. मिथुन मृग नक्षत्राचे 2, आर्द्रा आणि पुनर्वसू 3 चरण या राशीत येतात. बुध राशी स्वामी आहे. व्यय स्थानातील ग्रह अधिक खर्च आणि कार्य हानी करतात. 14 नंतर राशीत येणारा सूर्य तुमच्यामध्ये तेज निर्माण करेल. प्रकृती सुधारू लागेल. पण वादविवाद, गैरसमज टाळा. शनी अष्टम स्थानात वक्री होत आहे. जोडीदाराला वेळ द्या. आर्थिक लाभ संभवतात. बुद्धीचा वापर करा. शनी उपासना करणं योग्य राहील. कर्क पुनर्वसू 1 चरण, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्र या राशीत येतात. राशी स्वामी चंद्र आहे. कर्क राशीला हा आठवडा मिश्र फळ देणारा आहे. सुरुवातीला थोडा खर्च  वाढेल. पण नंतर लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. व्ययात येणारा रवी नेत्र विकार आणि आरोग्य सांभाळा असं सुचवतो आहे. कायदा पाळा, सतर्क राहा आणि विजय मिळवा. रवी उपासना करावी. सिंह मघा, पूर्वा आणि उत्तरा 1 चरण हे नक्षत्र या राशीत येतात. राशी स्वामी रवी आहे. मंगळाचे व्यय स्थानातील भ्रमण कायद्याच्या चौकटीत राहून काम करा असं सांगत आहे. रवी लाभात येऊन नवीन संधी आणि यश मिळवून देईल. खर्चावर नियंत्रण असावं. गुरू पाठीशी असल्यावर काळजी नसावी. शत्रूवर विजय मिळणारच. पित्त असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. मंगळाची उपासना करावी. कन्या या राशीत उत्तरा 3 चरण, हस्त आणि चित्रा 2 चरण ही नक्षत्रं येतात. राशी स्वामी बुध आहे. तुमच्या बुद्धी आणि कीर्तीवर अनेक लोक जळतात. त्यांना डावलून पुढे जा. यश देणारा आठवडा आहे. महिला आपल्या जबाबदारीवर कार्य पूर्ण करतील. पोटाचे विकार, पित्ताकडे लक्ष ठेवा.आर्थिक घडामोडी होतील. मुलांची चिंता वाटेल. गुरू उपासना करावी. तुला चित्रा नक्षत्राचे 2 चरण स्वाती आणि विशाखा 3 चरण या राशीत येतात. राशी स्वामी शुक्र आहे कार्य क्षेत्रात नवीन संधी चालून येतील. तुला व्यक्तींनी पोटाचे किंवा इतर काही त्रास असतील तर दुर्लक्ष करू नये. कोणाशी शाब्दिक वाद ना करता कामावर लक्ष ठेवावं. आर्थिक व्यवहार जपून करावे. राहुचा जप करावा. वृश्चिक विशाखा 1 चरण, अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्र या राशीत असतात. राशी स्वामी मंगळ. आश्रमात प्रवेश करणारा सूर्य प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवतो. गृह सौख्य उत्तम लाभेल. नवीन वास्तु किंवा वाहन यासाठी प्रयत्‍न सुरू ठेवावं. शनी महाराज प्रसन्न आहेत. फक्त राशिस्थानी असलेला केतू प्रकृतीची सतत कुरबूर सुरू ठेवेल. श्री गणेश स्तोत्र म्हणावं. धनु मूळ, पूर्वाषाढा उत्तराषाढा  1 चरण ही नक्षत्रं धनु राशीत असतात. राशी स्वामी गुरू. हा सप्ताह धनु व्यक्तींना मध्यम आहे. साडेसाती असली तरी गुरुकृपेने फारसा त्रास होणार नाही. मंगळ अष्टमात प्रवास संभवतात. वाहन जपून चालवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. भावंडाची गाठभेट होईल. संबंध सुधारतील. सूर्यभ्रमण शुभ आहे. गुरू जप करावा. मकर उत्तराषाढा नक्षत्राचे 3 चरण, श्रवण आणि धनिष्टा 2 चरण मिळून ही रास  बनली आहे. राशी स्वामी शनी. मंगळ शुक्र व्यवसायात नवीन संधी, लाभ मिळवून देतील. गुरू कृपा आहे. उत्तम मार्गांनी धनप्राप्ती  होईल. राशीतील शनीमुळे कधीतरी  नैराश्य येऊ शकते. उपासना करत रहा. मुलांकडे लक्ष द्या. शनी जप करावा. कुंभ धनिष्टा 2 चरण शत तारका, पूर्वा भाद्रपदा, 3 चरण ही नक्षत्रं कुंभ राशीत येतात. राशी स्वामी शनी. या सप्ताहात उत्तम फळ घेणारी ही रास. प्रकृती ठिक राहिल. घरांमध्ये काही प्रश्न असतील तर ते वाढू देऊ नका. सूर्यभ्रमण शुभ आहे. मुलांची प्रगती होईल. व्ययात शनी आहे, तेव्हा सावधगिरी बाळगावी. गुरू महाराज कृपा करतील. अचानक अडचणी आल्या तरी निभावून न्याल. शनी उपासना करावी. मीन पूर्वा भा. 1 चरण, उत्तरा भाद्रपदा अणि रेवती ही नक्षत्रं या राशीत येतात.राशी स्वामी  गुरू आहे. बारावा गुरू आहे. धार्मिक कार्यासाठी खर्च करावेत. चतुर्थ स्थानात येणारा सूर्य शुक्र घराबाबत काही बदल घडवतील. मुलांची काळजी घ्या. तरुणांना काळ चांगला आहे. नोकरीमध्ये यश मिळवून देणारा काळ आहे. मोठ्यांची काळजी घ्या. गुरू जप करणं योग्य ठरेल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published: