Home /News /lifestyle /

Chanakya Niti: भीतीमुळे सोडू नका ध्येयाचा पाठलाग; दृढ निश्चय बदलेल आयुष्य

Chanakya Niti: भीतीमुळे सोडू नका ध्येयाचा पाठलाग; दृढ निश्चय बदलेल आयुष्य

आचार्य चाणक्य सांगतात निंदकांना घाबरून कधीही आपलं ध्येय सोडू नका.

आचार्य चाणक्य सांगतात निंदकांना घाबरून कधीही आपलं ध्येय सोडू नका.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार (Chanakya Niti) ध्येयाचा पाठलाग करताना कोणाकडेही लक्ष देऊ नका.

    दिल्ली, 15 जून : चाणक्य (Chanakya Niti) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी, कूटनीती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येक जण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya)  म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये (Difficult Time) व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things) ओळखण्याची क्षमता (Capacityयेते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful lifeजगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. आचार्य चाणक्य सांगतात निंदकांना घाबरून कधीही आपलं ध्येय सोडू नका. दृढ निश्चयच आयुष्य बदलू शकतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति कितीही कठीण वाटल्या तरी देखील जीवनाची सत्यता त्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण चाणक्यनीतिकडे दुर्लक्ष करतो. मात्र अडचणीच्या काळामध्ये चाणक्यनीति आपल्याला योग्य मार्ग दाखवते. चाणक्य नीतिमध्ये निंदा करणाऱ्यांशी कसं वागावं या संदर्भात मार्गदर्शन केलं गेलं आहे. (Chanakya Niti: आयुष्यात सफल होण्यासाठी आजच बदला 'या' वाईट सवयी) आचार्य चाणक्य सांगतात कोणत्याही लोकांच्या बोलण्यामुळे आपलं ध्येय सोडू नका. ज्यावेळी तुम्ही तुमचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करता. त्याच वेळेस तुम्हाला त्या वाटेवर अडवणारे, तुमची निंदा करणारे, टोमणे टचके मारणारे अनेक लोक भेटतील. मात्र, त्यांचं ऐकून तुमचं ध्येय सोडू नका. आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळेच लोक त्याला मदत करणारे भेटतील असं नाही. अनेक लोक यशाचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण आपल्या ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. तेव्हा अनेक लोकांना त्याचा त्रास होत असतो. त्यांच्या मनात आपल्याबद्दल इर्षा निर्माण होत असते. ज्यांच्या मनात आपलं ध्येय गाठण्याची प्रबळ इच्छा असते. ते लोक यशासाठी प्रयत्नही करत असतात. अशक्य शक्य करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. (साप्ताहिक राशीभविष्य : कोणासाठी उत्तम, कोणासाठी अडचणीचा ठरणार हा आठवडा?) अशा वेळेस इतरांना मात्र त्यांच्या प्रगतीचा त्रास होत असतो. जे गोष्ट यश मिळवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात. ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही चुकीचा मार्ग निवडलेला आहे, तुमचे प्रयत्न कमी पडत आहेत, तुम्हाला ध्येय प्राप्ती होणार नाही असं बोलून हिंमत कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या परिस्थिती अडकलेल्यानी लोकांकडे मुळीच लक्ष देऊ नये असं आचार्य चाणक्य सांगतात. अशा लोकांचा विचार करायला सुरूवात केली तर, आपली पावलं अडखळतात. आपल्या मनामध्ये शंका जागा घेऊ लागतात आणि त्यामुळेच ध्येयप्राप्तीसाठी करत असलेल्या प्रयत्नांमध्ये आणखीन अडचणी निर्माण होतात. (कुंडलीतली गुरुची स्थिती बघून घाला अंगावर सोनं, नाहीतर होऊ शकतो तोटा) त्यामुळे कोणी काहीही बोललं तरी, त्याकडे दुर्लक्ष करा. यश मिळवल्यानंतर हेच लोक आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. त्यामुळेच निंदा करणाऱ्या लोकांच्या बोलण्यात घेऊन आपलं ध्येय सोडू नका. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर हेच लोक तुमच्याबद्दल कौतुक करायला लागतात. असा सल्ला आचार्य चाणक्यांनी दिली आहे. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Acharya chanakya, Chanakya niti

    पुढील बातम्या