दिल्ली,16 जून:चाणक्य **(**Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य **(**Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य **(**Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये **(Difficult Time)**व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी **(Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)**येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही **(peaceful life)**जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीति आयुष्यात वापरल्या आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध होऊ शकतं. चाणक्यांनी आर्थिक संकटांबद्दल भाकीतं करून ठेवलेली आहेत. त्यांच्या मते जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आर्थिक संकट येतं त्यावेळेस 5 संकेत मिळत असतात. ( Chanakya Niti: भीतीमुळे सोडू नका ध्येयाचा पाठलाग; दृढ निश्चय बदलेल आयुष्य ) तुळशीचं झाड सुकतं हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे. तुळशीचं झाड सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. आचार्य चाणक्य सांगतात घरातील तुळशीच्या झाडाची विशेष काळजी घ्यायला हवी. ज्यावेळेस आर्थिक संकट येतं त्यावेळेस तुळशीचं झाड सुकायला लागतं. घरात वाढलेली भांडणं आचार्य चाणक्य सांगतात ज्या घरामध्ये सतत भांडण होतात त्या ठिकाणी लक्ष्मी कधीच स्थिर राहत. अशा घरात कामामध्ये अडथळे येतात. ज्या परिवारामध्ये सतत मतभेद, भांडण होतात तिथे आर्थिक संकट येतात. त्यामुळे घरात भांडणं होऊ देऊ नका. नाहीतर संकटांचा सामना करावा लागेल. ( या 4 राशींच्या मुली असतात सुयोग्य पत्नी; जाणून घ्या तुम्ही आहात का नशिबवान? ) काचेचं तुटणं घरात काचेची वस्तू आरसा तुटणं आर्थिक संकटाचे संकेत आहेत. त्यामुळे घरात तुटलेली काच कधीही ठेवू नका. यामुळे घरात दारिद्र्य निर्माण होईल. देवांची पूजा होत नाही आचार्य चाणक्य सांगतात ज्या घरांमध्ये पूजाअर्चा होत नाही तिथे नकारात्मक शक्ती प्रवेश करतात. त्यामुळे घरामध्ये दारीद्रय येतं. घरातील लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि घरातलं वातावरण खराब होतं. त्यामुळे घरात कायम भक्तिमय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. ( रोज सकाळी करा हा सोपा उपाय; पुरुषांच्या लैंगिक समस्या होतील दूर ) वयोवृद्धांचा अपमान आचार्य चाणक्य सांगतात ज्या घरामध्ये वडीलधाऱ्यांचा अपमान केला जातो. त्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. त्यामुळे घरामध्ये वडीलधाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.