Home /News /astrology /

पायाच्या बोटांवरून कळतो तुमचा स्वभाव; अशा पायाचे लोक असतात Lucky

पायाच्या बोटांवरून कळतो तुमचा स्वभाव; अशा पायाचे लोक असतात Lucky

पायाच्या बोटांच्या आकार यावरून व्यक्तीचा स्वभाव त्याचं भाग्य याचे आराखडे बांधता येतात.

पायाच्या बोटांच्या आकार यावरून व्यक्तीचा स्वभाव त्याचं भाग्य याचे आराखडे बांधता येतात.

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology)एखाद्या जोडप्याचा घटस्फोट होणार का? याचाही अंदाज (Prediction) त्यांच्या पायाच्या बोटांच्या आकारावरून बांधता येऊ शकतो.

    दिल्ली,8 जुलै: ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) शरीरावरच्या खुणांमुळे देखील एखादी व्यक्ती भाग्यवान (Lucky) आहे का? याचा अंदाज बांधता येऊ शकतो. शरीरावर तीळ असणं, जोडलेल्या भुवया,चेहर्‍याचा आकार याच बरोबर पायाच्या बोटांच्या आकार यावरून देखील त्या व्यक्तीचा स्वभाव त्याचं भाग्य याचे आराखडे बांधता येतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायाचा अंगठा आणि त्याच्या जवळचं बोट व्यक्ती भाग्यवान आहे का हे सांगू शकतं. कधीकधी त्या व्यक्तीची वागणूक आणि स्वभाव (Behavior & Nature) कसा असेल हेही कळू शकतं. अंगठ्याजवळचं बोट अंगठ्याजवळचे बोट आणि इतर बोटं एकाच उंचीची असतील तर, असे लोक मेहनती असतात स्वतःच्या मेहनतीने आपली ओळख निर्माण करतात. वादापासून कायम दूर राहतात. अंगठ्या जवळच्या बोटापासून इतर बोटांची उंटी कमीकमी होत गेलेली असेल तर, असे लोक वर्चस्व गाजवणारे असतात. (हातपाय गमावले पण हरली नाही; 24 वर्षांची तरुणी 4 वर्षांपासून त्याच्या प्रतीक्षेत) आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असं त्यांना वाटत असतं. ज्या लोकांचा अंगठ्याजवळचं बोट मोठं असतं ते खूप उत्साही (Enthusiastic)असतात. असे लोक हातात घेतलेलं काम पूर्ण करतात. ज्यांच्या अंगठ्याजवळचे बोट छोटं असतं असे लोक जीवनात आनंदी राहतात आणि मनाने बळकट (Strong) असतात. (SBI ची नवी हॉलिडे स्कीम; RD प्रमाणे पैसे जमवा, फिरायला जा आणि वर व्याजही घ्या) करंगळीचा आकार ज्या लोकांच्या करंळी जवळचं बोट मोठं असतं असे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना सर्व कामांमध्ये रस असतो आणि यशही मिळतं. करंगळी आणि करंगळी जवळचे बोट एकाच आकाराचे असतील तर, अशा लोकाना सुदृढ संतत्ती प्राप्त होते. ज्या लोकांच्या पायाचा अंगठा आणि बोटं समान उंचीची असतात आणि इतर सर्व बोटं त्यापेक्षा लहान असतात असे लोक मेहनती आणि नम्र असतात.ते चांगला जोडीदार देखील असतात. (4 राशींच्या मुली असतात बुद्धिमान; पत्नी म्हणून लाभल्या तर होतो सुखाचा संसार) पती-पत्नी दोघांच्याही पायाच्या बोटांचे आकार सारखे असतील तर, अशा लोकांमध्ये घटस्फोटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं ज्योतिष शास्त्र सांगतं. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या