मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ची नवी हॉलिडे स्कीम; RD प्रमाणे पैसे जमवा, फिरायला जा आणि वर व्याजही घ्या

SBI ची नवी हॉलिडे स्कीम; RD प्रमाणे पैसे जमवा, फिरायला जा आणि वर व्याजही घ्या

भारतीय स्टेट बॅंकेने (SBI) एक अनोखं असं हॉलिडे पॅकेज (Holiday Package) आणलं आहे. त्यासाठी तुम्ही हप्त्यांप्रमाणे पैसे जमा करू शकता.

भारतीय स्टेट बॅंकेने (SBI) एक अनोखं असं हॉलिडे पॅकेज (Holiday Package) आणलं आहे. त्यासाठी तुम्ही हप्त्यांप्रमाणे पैसे जमा करू शकता.

भारतीय स्टेट बॅंकेने (SBI) एक अनोखं असं हॉलिडे पॅकेज (Holiday Package) आणलं आहे. त्यासाठी तुम्ही हप्त्यांप्रमाणे पैसे जमा करू शकता.

नवी दिल्ली, 8 जुलै : गेल्या दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून कोरोना (Corona) संकटामुळे लोक घरात आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लावण्यात आले. तसंच देशांतर्गत पर्यटनस्थळं बंद करण्यात आली. त्यामुळे पर्यटन (Tourism) पूर्णपणे ठप्प झालं होतं. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्यांवर परिणाम झाला. त्यामुळे पर्यटनासाठी खर्च करणं अनेकांना अजूनही परवडणारं नाही; मात्र आता परिस्थिती काही प्रमाणात सुधारत असून, लोक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. लोक पूर्ण सुरक्षितता बाळगून आणि सतर्कतेने फिरायला जाण्याची तयारी करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बॅंकेने (SBI) एक अनोखं असं हॉलिडे पॅकेज (Holiday Package) आणलं आहे. त्यासाठी तुम्ही हप्त्यांप्रमाणे पैसे जमा करू शकता.

विशेष म्हणजे यातून तुम्हाला व्याजदेखील मिळू शकणार आहे. ही एक प्रकारची मासिक आवर्ती ठेव (RD) योजना आहे. त्याद्वारे तुम्ही सुट्ट्यांसाठी या पॅकेजकरिता दर महिन्याला पैसे जमा करू शकणार आहात. त्यावर तुम्हाला व्याज मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती निवळत असताना या योजनेमुळे पर्यटनाला काहीशी चालना मिळेल अशी आशा आहे.

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, अशा पूर्वनियोजित बचतीमुळे पर्यटन हे आपल्यासाठी स्वप्न न राहता प्रत्यक्षात येऊ शकणार आहे. भारतीय स्टेट बॅंकेने थॉमस कुक (Thomas Cook) या पर्यटन कंपनीसह पर्यटनाला जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही थॉमस कुकच्या वेबसाइटवर हॉलिडे सेव्हिंग अकाउंट पॅकेजअंतर्गत देऊ केलेल्या हॉलिडे पॅकेजचा लाभ घेण्यासाठी एसबीआय रिकरिंग डिपॉझिटमध्ये मासिक तत्त्वावर बचत करू शकता.

थोडी जोखीम पत्करून एफडीपेक्षा दुप्पट नफा कमवायचाय? आजपासून उपलब्ध आहे हा पर्याय

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला थॉमस कुकच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचं हॉलिडे पॅकेज निवडू शकता. जे पॅकेज तुम्ही निवडाल त्याची किंमत 13 भागांमध्ये विभागली जाईल. यानंतर तुम्हाला ऑनलाइन एसबीआय पोर्टलवर (Portal) रिडायरेक्ट केलं जाईल. तिथे तुम्ही 12 मासिक हप्त्यांसाठी ई-आवर्ती जमा खातं सुरू करू शकाल. तुम्हाला ई-आरडीवर लागू असलेल्या व्याज दरानुसार 12 महिन्यांकरिता व्याज दिलं जाईल.

12 महिने संपले की मॅच्युरिटीनंतर मिळालेली रक्कम तुम्ही निवडलेल्या हॉलिडे पॅकेजसाठी थॉमस कुकला ट्रान्स्फर केली जाईल. ई-आरडी खात्यात व्याज जमा झाल्यानंतर थॉमस कूक कंपनी तुम्हाला पॅकेज खरेदीसाठी 13वा हप्ता प्रदान करेल.

First published:

Tags: SBI, Tour