मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हातपाय गमावले पण हार मानली नाही; 24 वर्षांची बेझा 4 वर्षांपासून 'त्याच्या' प्रतीक्षेत

हातपाय गमावले पण हार मानली नाही; 24 वर्षांची बेझा 4 वर्षांपासून 'त्याच्या' प्रतीक्षेत

ऐन तारुण्यात ती दिव्यांग झाली पण...

ऐन तारुण्यात ती दिव्यांग झाली पण...

ऐन तारुण्यात ती दिव्यांग झाली पण...

अंकारा, 07 जुलै :  साधं दुखलं-खुपलं तरी किती तरी लोक अगदी खचून जातात. आपल्याच वाट्याला दुःख का असंच यावेळी वाटतं. खरंतर दुःख, संकटं हे प्रत्येकाच्या वाट्याला असतात. पण त्याला हिमतीने तोंड देणारे मात्र मोजकेच. अशाच मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणजे  टर्की (Turkey) एक 24 वर्षांची तरुणी. जिने एका दुर्मिळ संसर्गामुळे आपले दोन्ही हातपाय (Girl lost her hand and leg in rare infection) गमावले. पण तिने हात मारली नाही, ती खचली नाही. तर आपल्याला एक तरी दिवस हातपाय मिळतील, या आशेवर ती जगते आहे.

24 वर्षांची बेझा डोगन (Beyza Dogan). चार वर्षांपूर्वी ती जर्मनीत (Germany) राहत होती. त्यावेळी मेनिंगोकोकल (Meningococcal Infection) संसर्ग झाला. संसर्गामुळे तिला तिचे हात-पायही काढून टाकावे लागले. इतकंच नव्हे तर तिच्या रक्तात विषारी पदार्थ पसरल्यामुळे तिची मूत्रपिंडं (Kidneys) निकामी झाली. 54 वर्षांची तिची आई मिहरीबन डोगन यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांची एक किडनी बेझाला दान (Kidney Donation) केली. त्यामुळे बेझाचे प्राण वाचले.

एवढ्या सगळ्या अडचणी वाचूनच आपल्या अंगावर काटा उभा राहतो; पण डेंटल टेक्निशियन असलेली बेझा आपल्या आयुष्याला कंटाळली नाही. तिने हार न मानता आपल्या आयुष्याची लढाई सुरूच ठेवली आहे. डबल आर्म ट्रान्स्प्लांट अर्थात दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणासाठी तिने धडपड सुरू केली.

हे वाचा - दो शरीर एक जान! दिव्यांग कपलच्या प्रेमाला तोड नाही; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

जनरल सर्जरी विशेषज्ञ असलेले तिचे फॅमिली डॉक्टर लेवेंट यिलमाझ यांचा सल्ला घेऊन ती टर्कीमधल्या अंताल्या (Antalya) इथं आली. तिथल्या अॅकडेनिझ युनिव्हर्सिटी फॅकल्टी ऑफ मेडिसीन (Akdeniz University Faculty of Medicine) या संस्थेतल्या प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी (Plastic and Reconstructive surgery department) विभागातले प्रा. ओमर ओझकान (Professor Omer Ozkan) यांच्याशी तिची ओळख झाली. डबल आर्म आणि फेस ट्रान्स्प्लांट (Double Arm & Face Transplant) यासाठी हे प्राध्यापक जगप्रसिद्ध आहेत.

आता बेझा एका योग्य अवयवदात्याच्या (Suitable Donor) प्रतीक्षेत आहे. तिचे फॅमिली डॉक्टर म्हणतात की तिच्या आतापर्यंतच्या तपासणीत कोणतीही अडचण आढळलेली नाही. योग्य अवयवदाता मिळाला, की तिच्या आर्म ट्रान्स्प्लांटेशनमध्ये काहीही अडचण येणार नाही.

हे वाचा - शाळेतून हाकललेला मुलगा झाला IPS ऑफिसर; अपयशानंतर असं केलं टार्गेट पूर्ण

"मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते. डॉ. ओमर ओझकान या विषयात खूप अनुभवी आहेत. त्यामुळे मी माझ्या जीवनातल्या आनंदाची आतुरतेने वाट पाहत आहे. लवकरात लवकर सर्जरी व्हावी, हेच माझं स्वप्न आहे", असं बेझा सांगते.

First published:

Tags: Handicapped legs, Health, Inspiration, Lifestyle, Motivation, Turkey