मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /या 4 राशींचं लोक असतात सगळ्यात lucky; लक्ष्मीची असते कृपा

या 4 राशींचं लोक असतात सगळ्यात lucky; लक्ष्मीची असते कृपा

नक्षत्रांच्या प्रभावामुळे काही राशींच्या अडचणी दूर होणार आहेत.

नक्षत्रांच्या प्रभावामुळे काही राशींच्या अडचणी दूर होणार आहेत.

लक्ष्मीची कृपा असलेल्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश (Success in Every Field) मिळतं. अशा राशींना लकी राशी (Lucky Sing) मानलं जातं.

मुंबई, 10 जून : प्रत्येक राशीचा (Lucky Zodiac Sign) स्वभाव वेगळा असतो. त्यांना मिळणारा लाभ वेगळा असतो. प्रत्येक राशीवर ग्रहांच्या भ्रमणाचा होणारा परिणाम देखील वेगळा असतो ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology)12 राशी आहेत. प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो. त्यानुसार राशीचा स्वभाव (Nature)ठरतो. त्या राशीला मिळणारे सुख हे ग्रहांच्या परिवर्तनावर अवलंबून असतं. काही राशींवर देवांची नेहमीच कृपा असते. त्यांनी हाती घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळतं, कौटुंबिक सुख मिळतं मात्र, काही राशीँच्या आयुष्यात अडचणी असतात. कितीही मेहनत केली तरी त्यांना अपयशाला सामोरं जावं लागत.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा त्यांनाही हवं असलं सुख आणि आनंद मिळतो. अशा राशीही असतात ज्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपादृष्टी (Grace of Goddess Lakshmi)असते. असे लोक वैभवात लोळतात. लक्ष्मी देवीला यश आणि वैभवाचं प्रतीक मानलं जातं. जाणून घेऊयात अशा राशी ज्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा असते.

लक्ष्मीची कृपा असलेल्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश (Success in Every Field)मिळतं. अशा राशींना लकी रासही (Lucky Sing) मानलं जातं. त्यामुळेच या राशीच्या लोकांना संपत्ती आणि वैभवाची कधीच कमतरता जाणवत नाही.

(Vastu Tips : घरातल्या या 5 वस्तू करतील संपत्तीच्या वाटा बंद;आजच फेका)

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांवर लक्ष्मीची कृपा असते. त्यांना नेहमी नशिबाची साथ मिळते. वृषभ राशीच्या लोकांना कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी फार कमी प्रयत्न करावे लागतात. त्यांना सहजपणे यश मिळतं. त्यांच्यावर कधीच आर्थिक संकट येत नाही. पैशाची कधीच कमी भासत नाही.

(सोडा पिवळा, गुलाबी; घरात लावा जांभळा रंग आयुष्य होईल Luxury)

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांवरही लक्ष्मीची कृपा असते. या राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या लोकांना सगळ्या सुखसुविधा मिळत राहतात अशी मान्यता आहे. हे लोक नेहमीच मेहनत करण्यावर विश्वास ठेवतात. एखादं काम हाती घेतल्यानंतर ते तडीस नेल्याशिवाय गप्प बसत नाहीत. या लोकांच्या कोणत्याही कामात फार अडचणी येत नाही.

( Chanakya Niti : यशस्वी होण्यासाठी करा ‘हे’ काम; संपतील सगळ्या अडचणी)

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना सदैव लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो. या राशीचा स्वामी सूर्य आहे. हे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात. तरीही साहसी, निडर आणि मेहनती असतात. यांचा आयुष्य सुखी समाधानी आणि संपन्न असतं.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांना पैशाची कधीच कमतरता भासत नाही. यांचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीचे लोक मेहनती, ऊर्जावान आणि लक्ष केंद्रित काम करणारे असतात.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs