दिल्ली, 8 जून : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीती कठीण काळामध्ये (Difficult Time) व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता (Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. त्यांनी नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी शिकवल्या.
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या लक्षात ठेवल्या तर आपलं आयुष्य नक्कीच यशाच्या (Success) शिखरावर जाऊ शकतं.
(परदेशी सेलिब्रेटींमध्ये 'संस्कृत' टॅटू डिझाइनची क्रेझ, काय आहे या शब्दांचा अर्थ)
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यनीतिनुसार आपलं आयुष्य जगायला हवं. आयुष्यात कोणत्याही गोष्टी करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तरच आपण यशस्वी आयुष्य जगू शकतो. जाणून घेऊयात चाणक्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या.
नवीन कार्य करतांना योजना बनवा
आचार्य चाणक्य यांच्यामते कोणतंही काम करताना त्या व्यक्तीने मनामध्ये त्याची योजना बनवायला हवी कोणत्याही कामांमध्ये अडचणी येतातच मात्र, योजना आखलेली असेल तर, त्या अडचणींवर मात करून आपल्याला पुढे जाता येतं
मेहनतील पर्याय नाही
आचार्य चाणक्य सांगतात यशाला कष्टाशिवाय पर्याय नाही. जे काम हातामध्ये घ्याल ते यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा. यशासाठी घेतलेले कष्ट कधीच व्यर्थ जात नाहीत. त्यामुळे महनत करायला तयार रहा.
(लशीआधी लहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; जगभरातील संशोधनाने कमी केली चिंता)
योजना सांगू नका
आचार्य चाणक्य यांच्यानुसार एखादं काम हातामध्ये घेतल्यावर त्यासाठी बनवलेल्या योजनेची कुणालाकडेही वाच्यता करू नका. योजना आधीच सांगितली तर त्यात अडचणी निर्माण होतातच, आपल्या योजनेबद्दल दुसऱ्यांना कल्पना दिली तर, त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल इर्षा निर्माण होते आणि मग अडचणी देखील निर्माण होतात. त्यामुळे कितीही जवळची व्यक्ती असली तरी, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत कुणालाच आपण काय करतो याची कल्पना देऊ नका.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Acharya chanakya, Chanakya niti