मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खोलीला चुकूनही लावू नका हा रंग; मुलं होतील चिडचिडी

खोलीला चुकूनही लावू नका हा रंग; मुलं होतील चिडचिडी

घरात असलेल्या काही निरुपयोगी गोष्टी घरात नकारात्मकता पसरवत असतात. 
त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

घरात असलेल्या काही निरुपयोगी गोष्टी घरात नकारात्मकता पसरवत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

भिंतीवरचे रंग आपल्या मूडवर परिणाम (Colour effects on mood) करतात. त्यामुळे भिंतींचा रंग निवडाताना विचार करावा.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 जून : सुंदर घराचं स्वप्न (Dream of a Beautiful Home) आपणं सगळेच पाहतो. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होतं तेव्हा, मनापासून त्याची सजावट (Decoration)करतो. घरातलं फर्निचर, घरातले पडदे आणि अगदी घराचा रंग देखील आपण निवडताना बरीच मेहनत घेतो. घराचा रंग निवडताना आपण एकतर ट्रेन्डी कलर निवडतो किंवा आपल्याला आवडीप्रमाणे मात्र, आपल्या घराचा रंग आपल्या मूडवर परिणाम (colour Affects on Mood) करत असतो. कलर थेरपीस्टच्या (Colour Therapist) मते घरातील भिंतींचे रंग आपला मूड (Mood), आपलं वागणं आणि स्ट्रेस (Stress)लेव्हलवर मोठा परिणाम करतात. काही रंग आपला स्ट्रेस वाढवू शकतात. तर काही रंग थकवा, ताण, भीतीची भावना निर्माण करतात. तज्ज्ञांच्या मते भिंतीचे रंग निवडताना थोडा रिसर्च, आपल्या गरजा यांचा विचार करूनच त्यांची निवड करा.

लाल रंग

कलर थेरपीस्टच्यामते, लाल रंगाचा संबंध एनर्जिशी असतो. लाल रंग आपली उर्जा वाढवतो. लाल रंगामुळे आपल्यात उत्साहाची भावना निर्माण होते. त्यामुळे घराच्या लिव्हिंगग रूममध्ये, डायनिंग रूममध्ये म्हणजे जिथे आपण आपल्या  कुटुंबाबरोबर वेळ घालवतो तिथे लाल रंगाचा वापर करावा. मात्र लक्षात ठेवा की लाल रंगाचा वापर बेडरूममध्ये करू नयेत. त्याने झोपेवर परिणाम होतो.

(एकटेपणा दूर करण्याचा सोपा उपाय, काय ते जाणून घ्या)

पिवळा रंग

पिवळा रंग सूर्य प्रकाशाचं प्रतिक मानला जातो. ज्यामुळे आनंद आणि उत्साह वाढतो. मूड चांगला आनंदी ठेवायचा असेल तर, पिवळा रंग वापरावा. पण, याने आपल्यात ऍग्रेशनही वाढतं. पिवळा रंग स्वयंपाक घर किंवा एखाद्या कोपऱ्यासाठी वापरणं योग्य आहे. लहान मुलांच्या या खोलीमध्ये पिवळ्या रंगाचा वापर चुकूनही करू नये. पिवळा रंग भिंतीला लावल्याने मुलांचा चिडचिडेपणा आणि रडणं वाढतं असं म्हंटलं जातं. त्यामुळे मुळे लहान मुलांच्या खोलीमध्ये मिक्स कलरचा वापर करावा.

निळा रंग

निळा रंग आपला मेंदू शांत करतो. त्यामुळे आपल्या मनालाही शांती मिळते. त्यामुळेच बेडरूम किंवा बाथरूमच्या भितींना हा रंग लावावा. निळ्या रंगाचा संबंध पाण्याशी असतो. त्यामुळे निळ्या रंगाची सॉफ्ट शेड वापरावी पण, गडद निळा रंग नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं.

(औषध म्हणून Steroid घेत आहात? या चुका टाळा; अचानक वाढेल वजन)

हिरवा रंग

हा रंग आपल्या मेंदूला शांतता देतो आणि क्रिएटिव्हिटी वाढवतो. घराच्या ज्या भागांमध्ये ज्या खोलीमध्ये आपल्याला शांतता हवी आहे अशा खोलीमध्ये थोडा भडक हिरवा रंग वापरावा. किचन किंवा लिव्हिंग रूम हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. मात्र ऑलिव्ह कलर आणि म्यूटेड टोन शेडने घरामध्ये डिप्रेशन येऊ शकतं.

जांभळा रंग

निळा आणि लाल रंग एकत्र केल्यानंतर तयार होणारा रंग म्हणजे जांभळा रंग. हा रंग आनंदाचं प्रतीक मानला जातो. गर्द जांभळा रंग लक्झरी लाईफचं प्रतीक मानला गेला आहे. ज्यामुळे रॉयल फिल येतो तर फिकट जांभळा रंग रंग शांततेचं प्रतीक मानला जातो.

(मैद्याचा मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो पाहा, तुम्हीही म्हणाल 'नको रे बाबा')

सफेद रंग

फार लोकांना घरामध्ये सफेद रंग लावायला आवडत नाही. तो रंग बोरिंग वाटतो मात्र, हाच सफेद रंग माणसाचा मूड रिलॅक्स आणि रिफ्रेश करतो. सफेद रंगामुळे घर प्रकाशमान आणि मोठं वाटतं घर छोटे असेल तर घरांमध्ये सफेद रंग जरूर लावा.

First published:

Tags: Home-decor, Lifestyle