मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Vastu Tips : घरातल्या या 5 वस्तू करतील संपत्तीच्या वाटा बंद; आजच फेका

Vastu Tips : घरातल्या या 5 वस्तू करतील संपत्तीच्या वाटा बंद; आजच फेका

फुटलेल्या वस्तू वेळ न लावता बाहेर फेकून द्या.

फुटलेल्या वस्तू वेळ न लावता बाहेर फेकून द्या.

Vastu Tips:वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. त्याचा आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम (Positive or Negative Effects on Life) होत असतो.

दिल्ली, 9 जून : एखाद्या  घरात वास्तुदोष (Vastu Dosha) असेल तर, त्यामुळे घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या प्रगतीमध्ये अडचणी (Problem in Progress) येतात. एवढेच नाही तर दैनंदिन जीवनात (Daily Life) देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा (Power) असते. त्यामुळे तिचा व्यक्तीच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम (Positive or Negative Effects on Life) दिसून येते. त्यामुळे होत आलेली कामंही अडकतात किंवा अडचणी येतात. तुमच्याही आयुष्यात अशा अडचणी येत असतील आणि सतत अपयशाला सामोरं जावं लागत असे तर, आपण आपल्या वास्तूला दोष द्यायला (Failure) सुरुवात करतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये ठेवलेल्या काही वस्तू देखील अडचणींचं कारण बनतात. जाणून घेऊयात कोणत्या वस्तू घरांमधून काढून टाकायला हव्यात.

पायपुसणी

घरात कधीच फाटकी पायपुसणी वापरू नका. फाटकी पायपुसणी असेल तर काढून टाका. त्यामुळे घरांमध्ये पैसा येण्यात अडचणी येतात. असं म्हणतात की, अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. फाटलेल्या पायपुसणीवरती पाय देऊन घरामध्ये येणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आणि त्या घरात देखील संकटं वाढयला लागतात.

(मुंबईने करून दाखवलं! 105 दिवसांनंतर पहिल्यांदाच मिळाला मोठा दिलासा)

खराब वस्तू

खराब झालेल्या वस्तूंमुळे नकारात्मक निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बंद पडलेल्या खराब झालेल्या वस्तू ठेवू नयेत. घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ कधीच ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी यायला लागतात. घरात घड्याळ बंद पडलं असेल तर तात्काळ दुरुस्त करा किंवा काढून टाका.

बेडखाली नको अडचण

बेडखाली अडचणीच्या वस्तू ठेवू नका असं वास्तुशास्त्र सांगतं. काही लोकांना आपल्या बेडखाली काही वस्तू ठेवायची वाईट सवय असते.  बेड किंवा पलंगाखाली कधीच चप्पल ठेवू नयेत, अडगळ ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

(Corona : कोल्हापूर-रत्नागिरी वगळता बहुतांश ठिकाणी दिलासाच, रिकव्हरी रेट 95%)

दान करण्यासाठी ठेवलेल्या वस्तू

वास्तुशास्त्रानुसार दान केलेल्या वस्तू घरात जास्त काळ ठेवल्यामुळे अडचणी निर्माण होतात. घरात दान करण्यासाठी तुम्ही पैसे किंवा वस्तू ठेवल्या असतील तर तात्काळ दान करा.

फुटलेल्या वस्तू

फुटलेल्या वस्तू वेळ न लावता बाहेर फेकून द्या. घरामध्ये फुटलेली भांडी, फुटलेल्या काचेच्या वस्तू कधीच ठेवू नयेत. वापरात असलेली वस्तू फुटल्यानंतर कितीही आवडत असली तरीदेखील ती फेकून द्यावी यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्रय घरामध्ये येतं.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Home-decor