• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • शीतल मोत्याचे फायदे तितकेच तोटे; 5 राशींनी मुळीच वापरू नये

शीतल मोत्याचे फायदे तितकेच तोटे; 5 राशींनी मुळीच वापरू नये

कर्क राशीसाठी मोती जास्त लाभदायक असतो

कर्क राशीसाठी मोती जास्त लाभदायक असतो

मोती जेवढे यश देऊ शकतो, तेवढीच मनशांतीही देतो. कर्क राशीसाठी जास्त लाभदायक असतो पण काही राशींनी मुळीच धारण करू नये.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै :  ज्योतिषशास्त्रानुसार  (According to Astrology) रत्न धारण करण्याने त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यात घडत असतो. रत्न शास्त्रानुसार रत्नांच्या चांगल्या गुणधर्माबरोबर(Good result) वाईट गुणांचाही परिणाम व्यक्तीवरती होत असतो. त्यामुळे कोणतंही रत्न धारण करताना त्याची संपूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण रत्नाच्या पूर्ण माहिती शिवाय धारण केल्यास नुकसान होऊ शकतं. रत्नांमध्ये मोत्याला  (Pearl) शांत आणि शितल रत्न मांनलं जातं. गोलाकार सफेद रंगाचा मोती समुद्रात शिंपल्यामध्ये सापडतो. याचा स्वामी चंद्र आहे. मोती कर्क राशीच्या लोकांसाठी जास्त लाभदायक (Lucky) मानला जातो. (धारण करा माणिक रत्न करिअरमध्ये गाठाल यशाचं शिखर; 5 राशींनी चुकूनही वापरू नये) कोणी धारण करावा ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात किंवा टेन्शन असतं अशा लोकांनी मनःशांतीसाठी मोती धारण करावा. मोती धारण केल्यामुळे लक्ष्मीची कृपा देखील होते. त्यामुळे ज्यांना संपत्ती संदर्भात अडचणी असतात त्यांनी मोती धारण करावा. या शिवाय ज्या व्यक्तींना प्रचंड राग येतो त्यांनी राग कमी करण्यासाठी मोती धारण करावा. (3 मुलींची लग्न लागली एकाच मांडवात; पाठवणीच्या वेळी मुख्यमंत्री झाले भावुक) लक्षात ठेवा मोती हा थंड प्रवृत्तीचा असल्यामुळे सगळ्याच राशींसाठी लाभदायक आहे. असं मानलं जातं की मोठी ठराविक राशींसाठी फायदेशीर ठरतो. ज्योतिष शास्त्रानुसार बारा राशींपैकी काहीच राशींने मोती धारण करावा. कर्क राशीच्या लोकांसाठी मोती धारण करणं उत्तम मानलं जातं. मात्र वृषभ, कन्या, मकर आणि कुंभ लग्न राशीच्या लोकांनी मोती धारण करू नये. रत्नशास्त्र सांगतं जे लोक प्रचंड हळवे असतात किंवा ज्यांना प्रमाणापेक्षा जास्त राग येतो अशा लोकांना मोत्याचा दुष्परिणाम दिसतो. याशिवाय हिरा,पाचू,नीलम आणि गोमेद बरोबर मोती वापरू नये. (नोकरी, व्यापारातील प्रगतीसाठी लाभदायक आहे पाचू; मात्र काही राशींचा करतो घात) मोती धारण करण्याचा विधी ज्योतिष शास्त्रानुसार मोती धारण करण्यासाठी शुक्ल पक्षाच्या सोमवारी रात्री आधी गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर शंकराची पूजा करू आपल्या करंगळीमध्ये हे रत्न धारण करावं. मोती चांदी सोबत धारण करणं फायदेशीर मानलं जातं. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: