मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नोकरी, व्यापारातील प्रगतीसाठी लाभदायक आहे पाचू; मात्र काही राशींचा करतो घात

नोकरी, व्यापारातील प्रगतीसाठी लाभदायक आहे पाचू; मात्र काही राशींचा करतो घात

पाचू रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीचं भाग्य पालटतं. विद्यार्थ्यांसाठी  हे रत्न अतिशय फलदायी मानले जातं. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी पाचू रत्न फलदायी ठरतं. याशिवाय वृषभ,तुला,मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांनी देखील हे रत्न धारण करावं. मात्र मेष,कर्क,वृश्चिक या राशीच्या लोकांनी पाचू रत्न धारण करू नये.

पाचू रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीचं भाग्य पालटतं. विद्यार्थ्यांसाठी हे रत्न अतिशय फलदायी मानले जातं. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी पाचू रत्न फलदायी ठरतं. याशिवाय वृषभ,तुला,मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांनी देखील हे रत्न धारण करावं. मात्र मेष,कर्क,वृश्चिक या राशीच्या लोकांनी पाचू रत्न धारण करू नये.

पाचू (Emerald) हे बुध ग्रहाचं रत्न म्हणून ओळखलं जातं. काही राशींसाठी हे रत्न अतिशय भाग्यशाली (Lucky) ठरतं. पण काहींना ते लाभत नाही. काय आहेत पाचू धारण करण्याचे नियम

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,16 जुलै : बुध ग्रहाचं हिरव्या रंगाचं रत्न म्हणजे पाचू यालाच इंग्रजीमध्ये एमरेल्ड (Emerald) म्हटलं जातं. पाचू रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीचं भाग्य पालटतं अशी धारणा आहे. विद्यार्थ्यांसाठी (Student) हे रत्न अतिशय फलदायी मानले जातं त्याच्या प्रभावामुळे बुद्धी तीक्ष्ण होतं, स्मरणशक्ती वाढते. व्यापाऱ्यांसाठी देखील हे रत्न लाभदायक (Lucky) आहे. कोणत्या राशी (Zodiac Signs) हे रत्न धारण करावं जाणून घेऊयात.

फायदेशीर परिणाम

हे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीला व्यापारामध्ये प्रचंड फायदा होतो. विद्यार्थ्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा स्मरणशक्ती चांगली नसेल तर, हे रत्न धारण करणं शुभ मानलं जातं. आजारी व्यक्तीने हे रत्न धारण केल्यास बलवर्धक ठरतं. हे रत्न धारण केल्यामुळे बुद्ध ग्रहाची कृपा वाढून चांगला प्रभाव मिळतो. नेत्र रोगांमध्ये देखील हे रत्न फायदेशीर आहे. याशिवाय पीआर,मीडिया, मास कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पन्ना धारणं करणं उत्तम मानलं जातं.

(नवरीचा हात हातात धरताच थरथर कापू लागला; लग्नाआधीच नवरदेवाची काय झाली अवस्था पाहा)

या राशीसाठी लाभदायक

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी पाचू रत्न फलदायी ठरतं. याशिवाय वृषभ,तुला,मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांनी देखील हे रत्न धारण करावं असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञ (Astrologer)  देतात.

(माणसंच नाही आता अशा पक्ष्यांपासूनही दूर राहा! अज्ञात आजार घेतोय जीव)

मात्र मेष,कर्क,वृश्चिक या राशीच्या लोकांनी पाचू रत्न धारण करू नये. सिंह,धनु आणि मीन राशीच्या लोकांना काही खास कारणांसाठीच हे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. लग्न राशी मध्ये बुध ग्रह, आठव्या सहाव्या आणि बाराव्या स्थानामध्ये असेल तर हे रत्न धारण करावं असं सांगितलं जातं.

(तुमचं वय 40 च्या आत आहे? या सुंदर शहरात स्थायिक होण्यासाठी मिळत आहेत 25 लाख!)

पाचू धारण करण्याचे नियम

पाचू रत्न चांदी किंवा सोन्याची अंगठी बनवून बुधवारी करंगळीमध्ये धारण करण्याचा सल्ला दिला जातो. सूर्योदयापासून 10 वाजेपर्यंत हे रत्न धारण करता येऊ शकतं. पाचू रत्न चांदी ऐवजी सोन्यात धारण केलं तर जास्त फायदा मिळतो. पाचूचा खडा कमीतकमी 3 कॅरेटचा असावा. हे रत्न धारण करण्याच्या आदल्या रात्री गंगाजल मध, खडीसाखर, दूध यांच्या मिश्रणामध्ये बुडवून ठेवाव. त्यानंतर बुधवारी सकाळी त्याची धूप-दीप दाखवून पूजा-अर्चा करून ओम बुद्धाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानंतर धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark