Home /News /lifestyle /

धारण करा माणिक रत्न करिअरमध्ये गाठाल यशाचं शिखर; 5 राशींनी चुकूनही वापरू नये

धारण करा माणिक रत्न करिअरमध्ये गाठाल यशाचं शिखर; 5 राशींनी चुकूनही वापरू नये

माणिक रत्न जेवढे यश (Success) देऊ शकतो, तेवढंच बरबादीचं कारण देखील बनू शकतं. काही राशींनी मुळीच धारण करू नये.

    नवी दिल्ली,17 जुलै : हिऱ्या प्रमाणेच माणिक रत्नाला ज्योतिषशास्त्रानुसार (According to Astrology) महत्त्व आहे माणिक(Manik) रत्नाला इंग्रजी मध्ये ‘रुबी’ (Ruby) म्हटलं जातं. लाल किंवा गर्द गुलाबी रंगाचा हा खडा दिसायला अतिशय सुंदर असतो. माणिक सूर्य ग्रहाचं रत्न मानलं जातं. हे रत्न धारण केल्यास सूर्याचा कृपेमुळे आयुष्यात यश (Success) प्राप्त होतं. सूर्य ग्रहाचा जास्तीत जास्त चांगला परिणाम (Good result) मिळवायचा असेल तर माणिक रत्न धारण करावं. मात्र ज्यांच्या जन्म पत्रिकेमध्ये काही दोष असतील त्यांना माणिक रत्न न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. माणिक रत्न जेवढं यश देऊ शकतो तेवढंच बरबादीचं कारण देखील बनू शकतं. जाणून घेऊयात माणिक रत्नाचे फायदे सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांसाठी हे रत्न अतिशय लाभदायक आहे. माणिक रत्न धारण करणाऱ्यांना शासकीय कामांमध्ये यश मिळतं. माणिक रत्नामुळे चेहऱ्यावर चांगली चमक येते. या रत्नाच्या चांगल्या प्रभावामुळे नोकरी आणि व्यापारामध्ये यश मिळतं. आत्मविश्वास वाढीसाठी देखील हे रत्न धारण केलं जातं. (ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स नेमका फरक काय? सर्वोत्तम ब्रेकफास्ट कोणता?) फायदेशीर परिणाम मेष,सिंह आणि धनु लग्न राशीच्या लोकांनी हे रत्न धारण करायला हवं. कर्क वृश्चिक आणि मीन लग्न राशी असणाऱ्या लोकांना हे रत्न अनुकूल मानलं जातं. मात्र ज्यांच्या पत्रिकेमध्ये दहाव्या, नव्या, पाचव्या आणि अकराव्या घरामध्ये सूर्याचा स्थान बळकट असतं अशा लोकांनी हे रत्न धारण केल्यास फायदा मिळतो. जन्म पत्रिकेमध्ये सूर्याचं स्थान बळकट नसेल तर माणिक रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. (3 मुलींच्या बिदाईच्या वेळी मुख्यमंत्री झाले भावुक; एकाच मांडवात लागली लग्न) कोणत्या राशींन धारण करू नये कन्या,मकर,मिथुन,तुळ आणि कुंभ लग्न राशीच्या लोकांनी चुकूनही हे रत्न धारण करू नये. ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य नीच स्थानी असेल त्यांनी हे रत्न घालू नये. जे लोक शनिशी संबंधित व्यापार करतात अशा लोकांना हे रत्न लाभदायक नाही. माणिक रत्न नीलम,हिरा किंवा गोमेद बरोबर परिधान केल्यास नुकसानदायक ठरतं. मात्र मोती, पाचू, पुष्कराज बरोबर घालणं फायदेशीर आहे. (नोकरी, व्यापारातील प्रगतीसाठी लाभदायक आहे पाचू; मात्र काही राशींचा करतो घात) धारण करण्याचा विधी हे रत्न सोन्याच्या आणखीमध्ये घालणं चांगलं असतं. शुक्ल पक्षाच्या पहिल्या रविवारी सूर्योदयानंतर करंगळीजवळच्या बोटामध्येही याची अंगठी घालावी. हे रत्न धारण करण्याच्या आदल्या रात्री गंगाजल मध, खडीसाखर, दूध यांच्या मिश्रणामध्ये बुडवून ठेवाव. सूर्योदयानंतर याची पूजा करावी ‘ओम ह्रां ह्रीं, ह्रौं सः सूर्याय नमः’ या मंत्राचा जाप करून ही अंगठी धारण करावी. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या