• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • गुरूच्या वक्रदृष्टीचे परिणाम; सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिकेला होणार त्रास

गुरूच्या वक्रदृष्टीचे परिणाम; सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिकेला होणार त्रास

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

गुरु ग्रहाच्या परिणामामुळे तूळ राशीच्या दाम्पत्य जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होणार आहेत. 3 राशींवर (Zodiac Sing) तर जास्त प्रभाव दिसेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 जून: ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) 20 जून 2019 पासून गुरु ग्रह शनी देवाच्या कुंभ राशीत वक्री होणार आहेत (guru vakri effects). गुरू 14 डिसेंबर 2019 पर्यंत याच राशीत  असतील. त्यानंतर मकर राशीमध्ये प्रवेश करतील. गुरु ग्रह वक्री झाल्यामुळे 12 राशींवर (Zodiac Sing) त्याचा परिणाम होणार आहे. गुरु ग्रहाचा प्रभाव 4 राशींवर जास्त असेल, जाणून घेऊया त्या राशी. सिंह रास गुरु ग्रह वक्री झाल्यानंतर या राशीला एक चांगली संधी मिळणार आहे. आपल्या जोडीदाराचा आजमावून पाहण्याची संधी मिळेल. या काळात प्रेम संबंधवर परिणाम होणार आहे. करिअरवर देखील गुरू ग्रहाचा परिणाम होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. या काळात नोकरीचा बदल केला तर ,आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय नोकरीच्या ठिकाणी वाद-विवाद देखील होऊ शकतात. आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवहार करताना जरा जपून करावेत. (Dry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत) कन्या रास गुरूच्या वक्रदृष्टीचा परिणाम झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होणार आहेत. म्हणजे नोकरीच्या ठिकाणी असलेले शत्रू नामशेष होतील. शत्रूंनी कितीही प्रयत्न केले तरी, त्यांना तुमच्यावर विजय मिळवता येणार नाही. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ब्लडप्रेशन,डायबेटिज अशा रुग्णांना या काळामध्ये काही त्रास भोगावे लागतील. व्यापार करणाऱ्यांना या काळात अडचणी निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खुप मेहनत करावी लागेल. (Vastu Tips: घरातील कलहाला कारण ठरेल आरसा;सकारात्मक उर्जेसाठी असा वापरा) तुळ रास गुरु ग्रहाच्या परिणामामुळे तुळ राशीच्या दाम्पत्य जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होणार आहेत. याचा नकारात्मक परिणाम आरोग्यावर होईल, विरुद्ध लिंगी व्यक्तींकडे आकर्षण वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि लग्नामध्ये अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी प्रतिकूल वातावरणात असेल. या काळात कायदा विरोधी काम करू नयेत. ('डबल चिन' कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी) वृश्चिक रास वृश्चिक राशीवर गुरू ग्रहाचा सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांचा अहंकार वाढेल आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. वृश्चिक राशीच्या लोकांनी आणि आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवावं. नाहीतर शत्रू वाढतील मात्र, वृश्चिक राशीला आर्थिक आघाड्यांवर फायदा होण्याची शक्यता आहे. दैनंदिन राशीभविष्य वाचा इथे - दररोज सकाळी आईच्या आरोग्यावर या काळामध्ये चांगले वाईट परिणाम पाहायला मिळतील. ज्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडेल. यावेळी आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: