दिल्ली,21 जून : आरसा (Mirror) आपल्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतो. घर सजावटीसुद्धा **(Home Decor)**आरसा आणि काचेचा वापर केला जातो. दिवसातून अनेक वेळा आपण आरशामध्ये बघत असतो. आरसा शोभून दिसावा यासाठी सुंदर शेप, डिझाईन आपण उत्साहाने बाजारातून घेऊन येतो. मात्र, आरसा आपण कुठे ठेवतो यावर घरातली सुखशांती (Peace of Mind at Home) अवलंबून असते. घरामध्ये आरसा कुठे असावा आणि कुठे असू नये यासंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) माहिती सांगण्यात आली आहे. घरात सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) निर्माण करण्याची ताकद आरशात असते. मात्र चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळे त्याचे वाईट परिणामही आपल्याला पाहावे लागतात. घराच्या कोणत्या दिशेला आरसा आहे? कोणत्या आकृतीचा आहे? घरातल्या वातावरणावर आरशाचा महत्वपूर्ण प्रभाव असतो. आरसा घरातल्या सर्व दोषांचं निवारण देखील करू शकतो. चला जाणून घेऊयात घरात आरसा कुठे लावायला पाहिजे. दिशा वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये आरसा अशा ठिकाणी लावावा ज्या ठिकाणावरून आरशामध्ये पाहणार्याला आपलं प्रतिबिंब पूर्व किंवा उत्तर दिशेला दिसेल. म्हणजेच पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर आरसा आलावा. ( लक्ष्मी कृपेसाठी हळदीचे काही उपाय आहेत फायद्याचे; घरात नांदेल सुखशांती ) आरशाचा आकार वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये चौकोनी, आयताकृती आरसा असणं शुभ असतं मात्र, घरामध्ये फुटलेला आरसा किंवा काचा ठेवू नयेत. याशिवाय टोकदार धारदार कधीच वापरू नये. तिजोरीमध्ये आरसा ठेवा घरातल्या तिजोरीमध्ये एक छोटासा आरसा जरूर ठेवावा. त्यामुळे पैशांमध्ये वाढ होते. ( जपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी ) बेडरूममध्ये आरसा नसावा विवाहित जोडप्यांच्या बेडरूममध्ये आरसा कधीच लावू नये. बेड समोर आरसा लावला तर किमान त्यावर पडदा टाकावा. पती-पत्नींचं प्रतिबिंब आरशात दिसत असेल तर त्यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असते. ( ‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा ) काही ठिकाणी आरसा मुळीच लावू नका बाथरूम मधल्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये कधीच आरसा लावू नका. लहान मुलांच्या खोलीत,स्टडी रूममध्ये, किचनमध्ये देखील आरसा ठेवू नये. मॅग्नेटवर आरसा चुंबकावर आरसा लावल्यामुळे घरांमध्ये निगेटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होते. शिवाय समोरासमोर आरसा नसावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.