'डबल चिन' कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी

'डबल चिन' कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी

चेहरा सुंदर असेल पण, डबल चिन (Double Chin) असेल तर, त्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतो. डबल चीन कमी करण्यासाठी योगासनांनी (Yoga) फायदा होतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून: डबल चिनने (Double Chin) चेहऱ्याचं सौंदर्य खराब होतं. मात्र, आता ही सर्वसामान्य समस्या बनलेली आहे. तब्येत कमी असली तरी, डबल चिनची समस्या उद्भवू शकते. वजन वाढलं (Weight Gain) तर, मग आणखीन त्रास होतो. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. त्यात यशही येतं पण, डबल चिन लवकर जात नाही.

डबल चिन म्हणजे काय?

गळ्या जवळच्या भागात रक्तभीसरण कमी (Blood circulation) झाल्याने डबल चिन होते. त्यामुळे या भागात ब्लडसर्क्युलेशन वाढलं तर डबल चिन जाते.

डबल चिनसाठी योगा

डबल चिन कमी करण्यासाठी योगा केल्याने फायदा होतो. त्यासाठी पाऊट करावा. त्यासाठी आपला गळा आतल्या बाजूला खेचावा. 30 सेकंद याच स्थितीत रहा. त्यानंतर रिलॅक्स व्हा. 3 ते 4 वेळा हिच क्रिया करा. गळ्यावरची चरबी कमी करायची असेल तर, एक सोपा उपाय आहे. आपली हनूवटी वर उचलून वरच्या बाजूला बघा. त्यानंतर आपल्या तोडांची उघडझाप करा. ही व्यायाम 10 ते 15 मिनीटं करा. त्यानंतर सावकाश आपली मान नॉर्मल स्थितीत आणा. चरबी कमी करण्यासाठी 3 ते 4 वेळा हिच क्रिया करा.

(हे वाचा- काय आहे नेहा कक्करचं ब्युटी सिक्रेट? आवाजाबरोबर चेहऱ्याचीही घेते अशी काळजी)

डबल चिन कमी करण्यासाठी आणखी एक योगासन चांगलं आहे. त्यासाठी तोंडात हवा भरा आणि चुळ केल्या प्रमाणे क्रिया करा. डाव्या आणि उजव्या बाजूला, वरखाली करा. ही क्रिया 20 ते 30 सेकंद करा. त्यानंतर रिलॅक्स व्हा. पुन्हा 3 ते 4 वेळा करा.

(हे वाचा- किस करताना जरा जपून! हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स)

चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी आणि तमाव कमी करण्यासाठी हे योगासन उत्तम आहे. यासाठी पाय दुमडून बसा आपले हात मांडीवर ठेवा. पाठ ताठ ठेवा. आपली जिभ जेवढी शक्य असेल तेवढी बाहेर काढा. पण, स्नायूंवर जास्त दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. श्वास घ्या, श्वास सोडा. ही क्रिया 6 ते 7 वेळा करा.

Published by: News18 Desk
First published: June 21, 2021, 7:45 AM IST

ताज्या बातम्या