मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Dry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत

Dry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत

कच्च्या दुधामध्ये अनेक बॅक्टेरिया देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.

कच्च्या दुधामध्ये अनेक बॅक्टेरिया देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.

वातावरण बदलाने कोरडा खोकला (Dry Cough) झाला असेल तर, घरगुती उपायांनीही (Home Remedies) उपयोग होतो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 20 जून: वातावरण बदलंल (Climate change) तर सर्दी,खोकला होतोच. पण, जर खोकला बरेच दिवस राहीला तर मात्र खूप त्रास होतो. बदलत्या हवामानात आणि पावसाळ्यात तर, कोरडा खोकला (Dry Cough) झाल्याने खूप त्रास होतो. कोरड्या खोकल्यामुळे शरीर कमजोर होतं, घसा-छातीत दुखतं आणि इतरांनाही त्रास होतो. कोरोनाच्या (Corona) काळात, खोकल्यामुळे संसर्ग (Infection) होण्याची भीती आहे. शक्यतो साध्या उपचाराने खोकला बरा होतो.पण, काहीवेळा बराच काळ त्रास रहतो. कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, काही घरगुती उपचारांनीही (Home Remedies) फायदा होतो.

पिंपळाची गाठ

कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, पिंपळाची गाठी उपयोगी येईल. पिंपळाची गाठ बारीक करून त्यात 1 चमचा मध घालून नियमित घ्यावी. यामुळे कोरड्या खोकल्यात आराम मिळेल.

(हे वाचा- रोज खा Mood चांगला करणारे हे 11 हेल्दी फूड; तणाव वाढणार नाही आणि उत्साही राहाल)

मध

कोरड्या खोकल्याच्या त्रासात मध आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. मध अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट खोकल्यासारख्या समस्या दूर करण्यात उपयुक्त आहेत. याशिवाय घशातील खवखव कमी करण्यातही मध उपयोगी ठरू शकतं. कोरडा खोकला झाला असेल तर, दिवसातून दोनदा हर्बल टी किंवा लिंबू पाण्यात 2 चमचे मध मिसळून प्यावा.

मीठ पाणी

कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकल्यात घशाला आराम मिळतो. याशिवाय मिठाच्या पाण्याने फुफ्फुसात जमा होणारा कफ कमी होते. यासाठी, एक कप कोमट पाण्यात पाव चमचा मीठ मिसळा. दिवसातून बर्‍याच वेळा गुळण्या केल्या तरी चालेल.

(हे वाचा- Fathers Day:पन्नाशीनंतर हार्ट अटॅक,कॅन्सरचा धोका;वाढत्या वयानुसार वडिलांच्या आरो)

आलं

आल्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. याने खोकल्यातही आराम मिळतो. काळी मिरी आणि आल्याचा चहा पिल्याने खोकला बरा होतो. मात्र याचा वापर कमी प्रमाणात करावा.

नीलगिरी तेल

खोकला बरा करायचा असेल तर, नारळाच्या तेलात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि छातीवर मॉलिश करा. गरम पाण्यात नीलगिरीच्या तेलाचे थेंब घालून वाफही घेता येते. यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याच त्रास होणार नाही.

(हे वाचा- तुम्हालाही आहे हेअरबॅण्ड मनगटावर बांधायची सवय? होतील गंभीर परिणाम)

पेपरमिंट

घश्यातली जळजळ आणि वेदना दूर करण्यात पेपमिन्टची मदत होऊ शकते. यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा पेपरमिन्टचा चहा प्या.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle