दिल्ली, 11 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) हिऱ्या प्रमाणेच पुष्कराज देखील अतिशय महत्त्वाचा रत्न आहे. हे धारण केल्यामुळे शिक्षण़, संपत्ती, धन आणि मान सन्मान यामध्ये वाढ होते अशी मान्यता आहे. पुष्कराज (Yellow Sapphire) गुरु ग्रहाचं रत्न म्हणून ओळखला जातं. याचा रंग पिवळा असतो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रह चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यांच्यासाठी हे रत्न अतिशय फलदायी (Lucky) ठरतं. हे रत्न धारण केल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती होते. अडलेली कामं मार्गी लागतात. विवाहातल्या अडचणी (Difficulties) संपतात. त्यामुळेच पुष्कराज घालण्याचा सल्ला दिला जातो. पाहूयात कोण कोणत्या राशींना पुष्कराज धारण केल्याने फायदा होतो. रत्नांमध्ये मुख्यतः नऊ रत्न घातली जातात, यात सूर्यासाठी माणिक, चंद्रासाठी मोती, मंगळसाठी- कोरल, बुधसाठी- पन्ना, गुरुसाठी-पुष्कराज, शुक्र- हिरा, शनी- नीलम, राहू- गोमेद आणि केतूसाठी लहसुनिया. हे रत्न आहेत. ( पावसाळ्यातले आजार पळवाचे असतील तर; हे 2 पदार्थ एकत्र खा! लगेच होईल फायदा ) मिथुन, कन्या आणि वृषभ राशीच्या लोकांनी (Zodiac Signs) पुष्कराज धारण करावा. वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर आणि कुंभ लग्न राशीच्या लोकांना पुष्पराज न घालण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार पुष्कराज बरोबर नीलम, हिरा, गोमेद हे रत्न देखील घातले पाहिजेत. ज्यांच्या पत्रिकेत गुरु ग्रह सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानामध्ये विराजमान असतात. त्यांनी पुष्कराज धारण करू नये. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रहाचा प्रभाव कमी असतो. त्यांच्यासाठी पुष्पराज लकी (Lucky) मानला जातो. धनु आणि मीन राशीच्या लोकांना हे रत्न विशेष भाग्यशाली आहे. ( पायाच्या बोटांवरून कळतो तुमचा स्वभाव;अशा पायाचे लोक असतात Lucky ) पुष्कराज धारण करण्याचा विधी नऊ ग्रहांमध्ये एखादा ग्रह कमजोर झाल्यास ज्योतिषी अनेकदा रत्न धारण करण्याचा सल्ला देतात. परंतू योग्य रित्या धारण केल्यासच याचा प्रभाव कळून येतो. रत्नांचा आपल्या जीवनावर कसा प्रकारे प्रभाव पडतो हे रत्न कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी धारण केलं गेलं आहे यावर अवलंबून असतं. पुष्कराज गुरुवारी सकाळी धारण करावा. गंगा जलामध्ये दूध मिसळून त्याने रत्न अभिषेक करावा आणि आणि गुरु मंत्र ‘को ऊं बृं बृहस्पती नमः’ याचा 108 वेळा जप करावा आणि त्यानंतर करंगळीजवळच्या बोटानेमध्ये हे रत्न धारण करावं. हे रत्न धारण केल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी मद्यपान आणि मांसाहार बंद करावा. पुष्कराज धारण करण्यासाठी सूर्योदयानंतर दहा वाजेपर्यंत चा कालावधी असतो. (चमचमता हिरा करतो घात; ‘या’ लग्न राशीने अजिबात वापरू नये) ( चमचमता हिरा करतो घात; ‘या’ लग्न राशीने अजिबात वापरू नये ) पुष्कराज घातल्याने फायदा ज्योतिष शास्त्रानुसार पुष्कराज धारण करण्यामुळे धन,समृद्धी, व्यवसाय आणि शौर्य यामध्ये वृद्धी होते. याशिवाय चैतन्य आणि आकलन शक्ती देखील वाढते. बुद्धीचा विकास होतो. व्यक्तीमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. याशिवाय शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्यासाठी देखील हे रत्न शुभ मानलं जातं. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.