नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका मगर (Crocodile) आणि झेब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मगरीने झेब्रावर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ आहे. मगरीने झेब्रावर हल्ला केला, पण झेब्राने मोठ्या प्रयत्नांनी स्वत:ची मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली. ट्वीटरवर हा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नदीमध्ये एक मगर शिकारीच्या शोधात आहे. त्याचवेळी नदीतून झेब्राची मोठी झुंड जात असते. झेब्राच्या झुंडीतून मगर त्यापैकी एका झेब्रावर हल्ला करते. पण झेब्रा संपूर्ण ताकदीने या मगरीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतो. त्यानंतर मगर पुन्हा त्याच झुंडमधून आणखी एका झेब्रावर, त्याचा पाय पकडून हल्ला करते. झेब्राचा पाय ती तोंडात पकडते आणि त्याला पाण्यात खेचू लागते. परंतु झेब्रा पूर्ण ताकदीने स्वत:ला बाहेर काढतो आणि हा झेब्रा देखील पुन्हा तिच्या हल्ल्यातून बचावतो.
त्यानंतर मगर पाण्यात असताना आणखी एक झेब्रा मगरीच्या वरून नदी पार करून जातो, परंतु मगरीला त्याला काहीही करता येत नाही.
हा व्हिडीओ बीबीसी डॉक्युमेंट्रीचा आहे. हा व्हिडीओ कुवेतमधील नाजी अल तखीम नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाले असून मगर आणि झेब्राचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.