मुंबई, 02 फेब्रुवारी : जंगलात जनावरांना दररोज खाण्यासाठी, स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मांसाहारी प्राणी आपल्या शिकारीसाठी इथे-तिथे भटकतात, तर शाहाकारी प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करतात. अनेकदा मांसाहारी प्राण्यांमध्ये खाण्यावरून मोठी भांडणंही होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये खाण्यासाठी अनेक बिबटे आपापसात भिडले असल्याचं दिसतंय. जंगलातील भुकेल्या बिबट्यांना खाणं देण्यासाठी दोन व्यक्ती एक गाडी घेऊन जंगलात पोहोचतात. ते गाडीतून मांसाचे तुकडे घेऊन आल्याचं दिसतंय. हे दोन व्यक्ती वन विभागाशी जोडलेले असू शकतात. ते दोघे गाडीतून मांसाचे तुकडे काढून बिबट्यांना टाकतात. बिबटे मांसाच्या तुकड्यांवर तुटून पडतात. मांसाचे तुकडे मिळवण्यासाठी ते एकमेकांवर हल्लाही करतात.
(वाचा - कांगारूला त्रास देत होता व्यक्ती; त्याने असा घेतला बदला की…; VIDEO VIRAL )
व्हिडीओमध्ये अनेक बिबटे खाण्यासाठी एकत्र आल्याचं दिसतंय. काही बिबटे एकमेकांकडून मांसाचे तुकडे हिसकावण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक बिबट्या आपला मांसाचा तुकडा घेऊन दूर जातो, शेवटी दोन बिबटे उरतात त्यांनाही मांस दिलं जातं असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
Harnas Cheetah Feeding Frenzy #Marc_van_Santen pic.twitter.com/AkSJy1EpW2
— ناجي الطخيم (@Naji_alt) January 30, 2021
हा व्हिडीओ नाजी अल तखीम नावाच्या एका ट्विटर युजरने आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे.
(वाचा - पक्ष्यावर धरला नेम पण शिकारीच झाला जखमी; नेमकं काय घडलं पाहा VIDEO )
हा व्हायरल व्हिडीओ असून ‘न्यूज 18 लोकमत’ या व्हिडीओची पुष्टी करत नाही.