डर्बन, 29 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात एक भयंकर अपघात घडला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकचा ताबा सुटला आणि त्यानं रस्त्यावर उभ्या असलेल्या चार गाड्यांचा चुराडा केला. या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ट्रक चालकावर कारवाई करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या ट्रकनं केवळ एक नाही तर तब्बल 4 गाड्यांना धडकला. ट्रक रस्त्यावरुन घसरण्याआधी रस्त्याच्या कडेला असलेल्या चार गाड्यांना या ट्रकने धडक दिल्याचे दिसत आहे. दरम्यान घटनास्थळी ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याची खात्री पटली आहे. वाचा- दोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट
वाचा- बम-बम भोले म्हणत त्यानं पूलावरून नदीत मारली उडी आणि…, थरारक VIDEO लाइफ रिस्पॉन्स पॅरामेडिक्सचे प्रवक्ते लिओन फौरी यांच्या म्हणण्यानुसार ट्रकचालकाने पुन्हा ट्रकमध्ये जाण्यापूर्वी मेट्रो पोलिसांशी संवाद साधल्यानंतर हा भीषण अपघात झाला आणि भरधाव ट्रक गाड्यांचा चिरडून रस्त्यावर उलटला. अचानक ट्रकचा वेग वाढल्यानं हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याचवेळी ट्रक चालकाने गाडीबाहेर उडी मारली त्यामुळे जवळच असलेल्या एका घराच्या दिशेनं ट्रक गेला. वाचा- झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा आणि…, बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक VIDEO ट्रक चालक यात गंभीर जखमी झाला होता. त्याला, त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी अन्य कोणत्याही जखमींची नोंद झाली नसल्याची पुष्टी त्यांनी केली.