मुंबई, 28 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ हसवणारे असतात, काही विचित्र असतात तर काही काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे जो पाहून कदाचित तुम्हाला धडकी भरेल. एक व्यक्ती झाडावर बसून झाडाचा शेंडा कापत असल्याचा व्हिडीओ आहे. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं? आपल्याकडे असं कितीतरी वेळा दिसून येतं. पण हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे कारण ही व्यक्ती साधासुध्या झाडावर बसून त्याचा शेंडा कापत नाही आहे, तर पाम ट्रीवर (Palm Tree) वर बसून त्याचा शेंडा कापत आहे आणि ते देखील आकाशाला भिडलेल्या एका पाम ट्रीचा. कोकण किनारपट्टीला सर्रास दिसणाऱ्या नारळ-सुपारींच्या झाडांपेक्षाही पाम ट्री जास्त उंच असते. त्यामुळे त्याचा शेंडा कापणं अधिक अवघड. या व्हिडीओमधील इसम चक्क या उंच झाडावर बसून त्याचा शेंडा कापत आहे. आणि शेंडा तुटून खाली पडल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या झाडावर हा इसम अडकून राहिला. ते झाड खूपच उंच असल्यामुळे कापताना ते एका बाजूला वाकले होते. पण कापून पूर्ण झाल्यानंतर शेंडा एका बाजुला फेकला गेला आणि उर्वरित झाड वेगळे झाले. एका क्षणासाठी वाटतं की तो माणूस देखील त्यामुळे दुसरीकडे फेकला जाईल की काय. पण तो तसाच त्या झाडावर हेलकावे खात बसला आहे.
Ever seen anyone cut a really tall palm tree?
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) September 25, 2020
Oh my god... https://t.co/O0sde0ZCz0
दरम्यान या व्हिडीओवर करण्यात आलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहे. सोशल मीडिया युजर हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही हे भीतीदायक असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. अशाप्रकारे पाम ट्री कापले जात नाहीत असा सल्लाही अनेकांनी दिला आहे. तर काहींनी म्हटले आहे की अचानक मला माझा जॉब खूप चांगला आहे असे वाटू लागले आहे.
Dude has a future on the Fury Road pic.twitter.com/o6YuKvsefA
— Carlos (@RiveraMD78) September 25, 2020
Literal interpretation of 2020 thus far.
— Emily Thies☮️ (@ejthies15) September 25, 2020
Would you stop with these videos! You’re gonna send me to my grave way too early! 😱😨😵😵🤢 pic.twitter.com/xjlNkMOB8g
— Felicia M. Perez (@katwomanfifi) September 25, 2020
Would you stop with these videos! You’re gonna send me to my grave way too early! 😱😨😵😵🤢 pic.twitter.com/xjlNkMOB8g
— Felicia M. Perez (@katwomanfifi) September 25, 2020
He's still up there swinging back and forth
— mike blair (@MikeyBlair) September 25, 2020
त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ज्यांनी शूट केला आहे ते देखील शॉकमध्ये असल्याचं कळतय. 6 मिलियनपेक्षाही अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे तर या व्हिडीओच्या लाइक आणि रिट्वीटची संख्या वाढतच आहे.