चंबा, 28 सप्टेंबर : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील रावी नदीत एका साधूने पुलावर उडी मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंघोळीसाठी साधूनं जुन्या बालू पूलावरून नदीत उडी मारली. साधूला पूलावरून उडी मारत असताना लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच साधू रावी नदीत उडी मारून पोहत नदीच्या काठावर पोहोचला. पोलिसांनी या साधूला पकडून त्याला सुलतानपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आले. जीव धोक्यात घालून रावी नदीत उडी मारल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून पुन्हा नदीत उडी मारणार नाही, असे लेखी लिहून घेतले, आणि सूटका केली. वाचा- म्हशींनी सिंहाला असा दाखवला इंगा की थेट पळतच सुटला, पाहा VIDEO
वाचा- झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा आणि…, बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक VIDEO पाच-दहा मिनिटं पूलाला होते लटकून सांगितले जात आहे की, पुलावरुन नदीवर उडी मारण्याआधी हा साधू पाच ते दहा मिनिटे लटकत होता. लोकांनी प्रथम लक्ष दिले नाही आणि नंतर साधूने उडी मारली तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की की साधू नदीच्या काठावर पोहोचला तेव्हा लोक जय जय भोलेनाथ असा जयघोष करत आहेत.