जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट

दोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट

दोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट

रोलर स्केट्स घालून दोरीवरच्या उड्या मारण्याचा विक्रम करून गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलेल्या खेळाडूने चार मित्रांसह एक नवा स्टंट केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : दोरीवरच्या उड्यांचे वेगवेगळे प्रकार सगळ्यांनीच लहानपणी पाहिलेले, केलेले, खेळलेले असतात. त्यात काही जण वेगळे स्टंटही करतात. पण स्केटिंग शूज (Roller skates skipping) घालून दोरीवरच्या उड्या मारणारा आणि अभूतपूर्व स्टंट्सनी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नाव नोंदवणारा अवलिया सरदारजी दिल्लीत आहे आणि त्याच्याच एका नव्या instagram video ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. झोरावर सिंग नावाचा हा दिल्लीकर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोरीवरच्या उड्यांच्या स्पर्धेत सहभागी होतो. त्यानेच आपल्या मित्रांसोबत हा नवा स्टंट केला आहे. झोरावरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या स्टंटचा video शेअर केला आहे आणि तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 6 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आज हे करणं शक्य झालं आहे. मी माझ्या मित्रांसोबत हा स्टंट केला आहे,अशी पोस्ट त्यानं यासोबत केली आहे. काय आहे या व्हिडिओत? चार मुलं दोरीवर एक स्टंट करतानाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्या चार जणांमध्ये एक मुलगा झोरावर सिंग हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. या आधी त्यानी रोलर स्केट घालून दोरीवरच्या उड्या मारून विक्रम केला आहे. या व्हिडीओ मध्ये पाहिलं तर चार तरुण दिसतील. त्यामध्ये खाली असलेल्या दोघांनी दुसऱ्या दोघांना खांद्यावर घेतलं आहे. खांद्यांवर बसलेले दोन तरुण उड्यांची मोठी दोरी फिरवत आहे आणि ते ज्यांच्या खांद्यांवर बसले आहेत ते तरुण त्यांना घेऊन दोरीच्या उड्या मारत आहेत.  त्यानंतर खांद्यांवरचे  दोघे खाली उतरतात. ते दोन दोऱ्या फिरवतात आणि त्यावर ते स्वत:  आणि त्यांना खांद्यांवर घेतलेले तरुणही उड्या मारतात. हात जमिनीवर टेकूनही उडी मारतात. हा जबरदस्त स्टंट खरोखरच पाहणाऱ्याला अवाक करून टाकतो. हे सगळं करताना त्यांचं टीमवर्क आणि परस्परांशी असलेला ताळमेळ असा आहे की तुम्हा आ वासून बघतच राहाल.

जाहिरात

या क्लिपमध्ये जे दिसत आहे, ते नक्कीच नाविन्यपूर्ण आहे. कोरोनामुळे घरात सुरक्षित राहून कसे, रोगापासून दूर राहू शकतो, शारीरिकदृष्ट्या कसे फिट राहू शकतो हे वेगवगेळ्या पद्धतीने सांगितले जाते. अशातच हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्यात आला आहे. दोरीवरच्या उड्या हा उत्तम व्यायाम प्रकार म्हणून ओळखला जातो. 25 सप्टेंबरला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर जोरावरसिंगने पोस्ट केला होता. त्या दिवसापासून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला खूपच चांगली पसंती दर्शवली आहे. हा व्हिडिओ पाहून काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे तर काहींनी चांगल्या प्रतिक्रिया देऊन या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर केलं आहे. हा व्हिडीओ 17 हजार लोकांनी पहिला आहे, तर 2 हजार 300हून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. तर काहींनी “सर, तुम्ही खरोखरच आश्चर्यकारक व्हिडिओ बनवला आहे,” अशी प्रतिक्रिया एका इंस्टाग्रामवर दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात