JOIN US
मराठी बातम्या / Viral / समुद्रावर पर्यटकांची गर्दी असतानाच कोसळली दरड, थरारक LIVE VIDEO आला समोर

समुद्रावर पर्यटकांची गर्दी असतानाच कोसळली दरड, थरारक LIVE VIDEO आला समोर

समुद्र किनाऱ्यावर मजा करत असताचा शेकडो पर्यटकांवर काळाचा घाला, अचानक कोसळली दरड. VIDEOमध्ये थरार कैद.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनरी, 17 नोव्हेंबर : बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन उघडल्यामुळे पर्यटनाला सुरुवात झाली आहे. स्पेनमध्येही काही बेटांवर मोठ्या प्रमाणावर लोकं फिरण्यासाठी जात आहे. मात्र स्पेनच्या कॅनरी बेटावर Canary Islands) शनिवारी दुपारी एक विचित्र प्रकार घडला. एकीकडे लोकं समुद्रावर पोहण्यासाठी जमले असतानाच अचानक दरड कोसळली. याचा लाइव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही दरड कोसळली तेव्हा किनाऱ्याजवळ मोठ्या संख्येनं लोकं आणि वाहनंही होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, दरड कोसळल्यानंतर अनेक लोकं त्या खाली अडकल्याची भीती व्यक्ती करण्यात होती होती. त्यानंतर लगेचच या बेटावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली गेली. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या वॅले ग्रॅन रे या लोकप्रिय रिसॉर्टमधील लोकांनी याचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये दरड कोसळताना दिसत आहे. दरड कोसळल्यानंतर रिसॉर्टमधील लोकंही पळून गेली. वाचा- आईने मुलीला दिली मातृत्वाची भेट; 51 वर्षाची महिला मुलीसाठी सरोगेट मदर

संबंधित बातम्या

वाचा- OMG! वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांची सुरू केली बकऱ्यांची चोरी कॅनरी बेटेचे अध्यक्ष एंजेल व्हिक्टर टॉरेस यांनी दरळ कोसळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला असून लोकांना दूर आवाहन केले आहे. व्हिडीओ पोस्ट करताना त्यानं ट्विटरवर लिहिले की, “धोकादायक. येथील परिस्थिती स्थिर असली तरी पुन्हा दरड कोसळण्याचा धोका आहे". या व्हिडीओमध्ये खडकाचा एक मोठा भाग वरून समुद्रात पडताना दिसत आहे. वाचा- VIDEO: पोलीस ठाणं झालं डान्स फ्लोअर, कर्मचाऱ्यांनी केलेला नागिण डान्स कॅनियन वीकलीने दिलेल्या माहितीनुसार, आपत्तीनंतर शोध आणि बचाव करण्यासाठी गार्डिया सिव्हिल, स्थानिक पोलिस, वेल ग्रॅन रे अग्निशमन दलाचे नागरी सुरक्षा आणि एईए (बचाव सेवा) या दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या