नवादा, 16 नोव्हेंबर : एकीकडे देशभरात दिवाळीचा उत्साह सुरू आहे तर दुसरीकडे पोलीस ठाणं डान्स फ्लोअर बनल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बिहारमध्ये सध्या पोलिसांचा नागिण डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता पोलीस जमिनीवर लोळून डान्स करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ कोणत्याही कार्यक्रमादरम्यानचा नसून पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक व्हिडीओ बिहार जिल्ह्यातील नवादा परिसरातला आहे. हा परिसर अत्यंत संवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी दिवाळीच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नागीण डान्स करून ठुमके लगावले आहेत. पोलिसांचा हा व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा- बीडमधील प्रेयसीवर अॅसिड जळीत प्रकरणी नवी घडामोड, लवकरच हत्येचा होणार खुलासा शिपायापासून ते हवालदारापर्यंत नागीन डान्स करण्यात कसे धुंद आहेत ते या व्हिडीओमधून आपण पाहू शकता. मिळालेल्या माहितीनुसार दीपावलीच्या रात्री प्रभारी आपल्या छोट्या टीमसोबत पेट्रोलिंगसाठी गेले असताना उर्वरीत पोलीस ठाण्यात असलेल्या हवालदार आणि शिपाई यांनी याचा फायदा घेतला आणि पोलीस ठाण्याचा डान्स फ्लोअर केला. मोठ्या आवाजात गाणी लावून नागीण डान्स सुरू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. मात्र अद्याप यातील कोणत्याही कर्मचाऱ्याला जाब विचारण्यात आला नाही अशी माहिती देखील मिळाली आहे. पण या घटनेचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

)







