Home /News /viral /

OMG! वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांची सुरू केली बकऱ्यांची चोरी

OMG! वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांची सुरू केली बकऱ्यांची चोरी

फंड नसल्यामुळे या चित्रपटाची निर्मिती थांबली होती. या चित्रपटात हे दोन्ही बंधू प्रमुख भूमिकेत होते.

    चेन्नई, 16 नोव्हेंबर : आपल्या वडिलांच्या चित्रपटासाठी फंड्स मिळवण्यासाठी तामिळनाडूतील दोन भाऊ 9 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये बकऱ्या चोरी करताना पकडण्यात आले होते. हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या गुराख्यांकडून एक-दोन बकऱ्या चोरी करीत होते. तरीही, ते इतके हुशार होते की ते कोणत्याही कळपातून दोनपेक्षा जास्त बकऱ्या ते चोरत नसत, कारण ज्या गुराख्याकडे भरपूर बकऱ्या आहेत त्याला एक-दोन बकऱ्या गायब असल्याने फार काही फरक पडणार नाही हे त्यांना माहीत होतं. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यू वॉशरमेनपेट येथील व्ही. निरंजन कुमार (30 वर्षीय) आणि त्याचा भाऊ लेनिन कुमार (30 वर्षीय) रोज आठ ते दहा बकऱ्या चोरायचे आणि मग ते प्रत्येकी 800 रुपयांना विकायचे. ते त्यांच्या वडिलांच्या ‘नी थान राजा’ या चित्रपटासाठी फंड गोळा करत होते. फंड नसल्यामुळे या चित्रपटाची निर्मिती थांबली होती. या चित्रपटात हे दोन्ही बंधू प्रमुख भूमिकेत होते. दोघे त्यांची गाडी घेऊन चेंगलपेट, माधवराम, मिंजूर आणि पोन्नेरी या भागांमध्ये फिरत असायचे आणि नेहमी रस्त्याच्या कडेला एकटे प्राणी चरायला आहेत का हे पहायचे. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घेताच ते ताबडतोब बकरी उचलून घ्यायचे आणि त्यांच्या गाडीत भरून पटकन गाडी घेऊन फरार व्हायचे. जेव्हा या दोन्ही भावांनी माधवारामधील पालनची बकरी चोरली तेव्हा मात्र ते संकटात सापडले. कारण पालनकडे फक्त 6 बकऱ्या असल्यामुळे त्यातील एक गायब होताच त्याने माधवाराम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.तपासणीत पोलिसांना आढळले की अनेक गुराख्यांच्या एक किंवा दोन बकऱ्या चोरीला गेल्या आहेत.अखेरीस 9 ऑक्टोबरला पोलिसांनी या दोन भावांना दोन बकऱ्या चोरताना रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी सुरुवातीला शेळ्या विकत घेऊन सगळीकडे जागांची पाहणी सुरु केली, त्यानंतर ते हळूहळू गोठा मालकांशी बोलल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ज्यांच्याकडं भरपूर बकऱ्या आहेत त्या मालकांना एखाद-दुसरी बकरी हरवली तर फार फरक पडत नाही. म्हणून त्यांनी मोठ्या गुराख्यांकडून एक-दोन बकऱ्या चोरायला सुरुवात केली होती. पण कमी बकऱ्या असलेल्या पालनची बकरी चोरली आणि ते गोत्यात आले.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या