JOIN US
मराठी बातम्या / Viral / विमानातच प्रवाशानं केलं असं कृत्य की सगळेच चक्रावले, क्रू मेंबर्सचीही उडाली धांदल

विमानातच प्रवाशानं केलं असं कृत्य की सगळेच चक्रावले, क्रू मेंबर्सचीही उडाली धांदल

विमान हवेत असतानाच एक व्यक्ती अचानक उठला आणि विमानाच्या आपात्कालीन दरवाजापर्यंत (Emergency Door of Airplane) पोहोचला. यानंतर तो हे गेट उघडण्याचा प्रयत्न करू लागला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली 28 मार्च : दिल्लीहून वाराणसीसाठी उड्डाण केलेल्या स्पाइस जेटच्या (SpiceJet) विमानात एक अशी घटना घडली ज्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरुन गेले. एका व्यक्तीच्या विमानातील एका कृत्यामुळे फक्त प्रवासी नाही तर क्रू मेंबर्सही हैराण झाले. विमान हवेत असतानाच एक व्यक्ती अचानक उठला आणि विमानाच्या आपात्कालीन दरवाजापर्यंत (Emergency Door of Airplane) पोहोचला. यानंतर तो हे गेट उघडण्याचा प्रयत्न करू लागला, यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीनं गेट उघडण्याचा प्रयत्न करतानाच आसपास बसलेल्या प्रवाशांनी आणि क्रू मेंबर्सनं प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीला सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोन ते तीन लोकांनी या व्यक्तीला धरुन ठेवलं. इतकंच नाही तर विमान हवेत असताना तब्बल 40 मिनीट प्रवाशांनी या व्यक्तीला असंच पकडून ठेवलं. यानंतर वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री विमानतळावर पोहोचताच विमानतळ सुरक्षाकर्मी आणि सीआयएसएफच्या जवानांनी या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या विमानामधून तब्बल 89 लोक प्रवास करत होते. जवळपास 40 मिनीट प्रवाशांना या व्यक्तीला पकडून ठेवावं लागलं. या वेळात प्रवाशांनी अक्षरशः श्वास रोखून धरला होता. हा व्यक्ती गुरुग्रामचा रहिवासी असून त्याचं नाव गौरव खन्ना असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही काही प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्याच कैद केला. यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. सुरुवातीला चौकशी करुन या व्यक्तीला फूलपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सध्या पोलीस गौरवचं मेडिकल करत असून पुढील तपास सुरू आहे. हा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचंही म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या