कझाकिस्तान, 06 फेब्रुवारी : बर्फापासून (Ice) बनवला जाणारा स्नो मॅन तुम्ही पाहिला असेल. पण सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ (video) व्हायरल (viral) होतो आहे, जो पाहून धक्काच बसेल. बर्फवृष्टीमुळे (snowfall) चक्क जिवंत प्राणी बर्फाचे पुतळे बनले आहेत (animal freezing). पाहता पाहता जसे आहेत त्याच स्थितीत हे प्राणी अक्षरश: गोठले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला शॉकच बसेल. थोडी जरी थंडी वाढली तरी आपल्याला हुडहुडी भरते. साधा बर्फ हातात घेतला तरी तो काही सेकंदही धरवत नाही. विचार करा अशा बर्फवृष्टीत मग प्राण्यांच काय होतं असेल. असाच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आयएफएस अधिकारी प्रवीनअंगुसामी यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. “पर्यारणात होणारा बदल आता दिसून येतो आहे. कझाकिस्तानमध्ये तापमान -51 डिग्री सेंटीग्रेटवर पोहोचलं आहे. ज्याचा प्राणी आणि तिथल्या जैवविविधतेवर दुष्परिणाम होतो आहे, असं ते म्हणाले” हे वाचा - चक्क कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून मगरीनं ठोकली धूम; कधीच पाहिला नसेल असा VIDEO हा व्हिडीओ कझाकिस्तानमधील आहे. जिथं सध्या खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आहे. नजर जाईल तिथं सगळीकडे बर्फच बर्फच. पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली दिसते. असा बर्फ पाहताच मन प्रफुल्लित होतं, डोळ्यांना आनंद मिळतो. पण वरवर आपल्याला उत्साहीत करणाऱ्या या बर्फामुळे कित्येक प्राण्यांचा जीव गेला आहे. प्राणी ज्या स्थितीत दिसत आहे, ते पाहता बर्फवृष्टीपासून आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पण बर्फाखाली ते झाकले गेले. बर्फात गोठले आणि त्यांचा जीव गेला. ते आहेत त्याच स्थितीत कडक झाले. व्हिडीओ एका कुत्र्यावर बसलेल्या छोटासा उंदीरही पाहू शकता. कदाचित बर्फापासून आपला बचाव करण्यासाठी तो कुत्र्याच्या मानेवर येऊन बसला असावा. हे वाचा - मालकीणीला पाहून कुत्रा झाला भलताच इमोशनल, पाहा त्यांच्या प्रेमाचा हा Video असे एक ना दोन कित्येक प्राणी आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर अक्षरशः काटाच येतो.