जाहिरात
मराठी बातम्या / Viral / याला म्हणतात डेअरिंग! चक्क कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून मगरीनं ठोकली धूम; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

याला म्हणतात डेअरिंग! चक्क कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून मगरीनं ठोकली धूम; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

याला म्हणतात डेअरिंग! चक्क कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून मगरीनं ठोकली धूम; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

जे वाघ, बिबट्या यांनाही जमलं नाही ते एका छोट्याशा कुत्र्यानं केलं. मगरीला त्यानं सरो की पळो केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 फेब्रुवारी : मगर… जी मोठ्या हुशारीनं शिकार करते. वाघ, बिबट्यासारख्या हिंस्र आणि ताकदवान प्राण्यांचंही तिच्यासमोर काहीच चालत नाही. काही समजायच्या आतच ती त्यांच्यावर हल्ला करते आणि पाहता पाहता दुसऱ्याच क्षणी त्यांना आपल्या जबड्यात धरून संपवून टाकते. तिच्याशी पंगा घेण्याची हिंमत तशी कुणीच करत नाही. मग विश्वास बसणार नाही, चक्क एका कुत्र्याच्या पिल्लानं ही हिंमत केली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

वाघ, बिबट्याही जे करू शकलं नाही ते एका कुत्र्याच्या पिल्लानं केलं आणि विशेष म्हणजे मगरीनंही कुत्र्याला घाबरून तिथून धूम टाकली. असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल. हे वाचा -  कॅमेऱ्यात दिला असा लुक!वडेट्टीवारांनी शेअर केला ताडोबातील काळ्या बिबट्याचा VIDEO आयएफएस अधिकारी सुधा रेमेन यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पाहू शकता एक मगर जमिनीवरशांत, निवांत बसली आहे. तिच्याजवळ एक कुत्र्याचं पिल्लू आहे. ते पिल्लू मगरीवर जोरजोरात भुंकत आहे. मगरीला ते अजिबात घाबरत नाही. कुत्र्याचं पिल्लू इतकं भुंकतं, इतकं भुंकतं की एका क्षणाला वाटतं मगर त्याच्यावर आता हल्लाच करेल. पण होतं उलटंच. मगर या कुत्र्यावर हल्ला करत नाही तर चक्क ती त्याला घाबरते आणि तिथून धूम ठोकतं. कुत्र्याजवळून ती पळ काढते. कुत्रा काही तिचा पिच्छा सोडत नाही. मगर जशी पळू लागते. तसं कुत्रंही तिच्यामागे धावत सुटतं तिची शेपटी आपल्या तोंडात पकडण्याचाही प्रयत्न करतं. पण मगर त्याच्यापासून आपली सुटका करतेच. शेवटी कुत्र्याचं पिल्लू मागे फिरतं आणि परत आपल्या जागेवर येतं. हे वाचा -  बिबट्यासोबत 7 तास अडकला होता कुत्रा, पुढे जे काही झालं ते पाहून आश्चर्य वाटेल एवढ्याशा कुत्र्याच्या हिमतीला दाद द्यायला हवी. मगरीच्या ताकदीची त्याला कल्पना आहे की नाही माहिती नाही. पण तरी त्यानं मगरीशी पंगा घेतला आणि तिला सरो की पळो केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात