मुंबई, 6 फेब्रुवारी : सोशल मीडियाचं (social media) जग हे सतत हॅपनिंग असतं. इथं आजची गोष्ट उद्या अगदीच जुनी होऊन जाते. नव्या दिवसात कधी काय व्हायरल (viral) होईल सांगता येत नाही. आता असाच एक व्हिडीयो नेटकऱ्यांनी प्रचंड डोक्यावर घेतला आहे. हा व्हिडीयो पाहून तुम्हीही इमोशनल व्हाल. हा व्हिडीयो (video) आहे एक पाळलेला कुत्रा (dog) आणि त्याच्या मालकीणीचा (owner). दोघांमधलं नातं पाहून दोघेही एकमेकांवर किती प्रेम (love) करतात याचा अंदाज लावता येऊ शकेल.
कुत्री आणि मांजरांचे व्हिडीओज तसे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ मात्र खास आहे. हा व्हिडीओ एक पाळीव कुत्रा आणि त्याच्या मालकीणीचा आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकाल, की प्राण्यांनाही अगदीच माणसांसारख्या भावना असतात आणि तेसुद्धा प्रेम करतात.
(वाचा - नदी पार करणाऱ्या झेब्रावर मगरीचा हल्ला; पाहा नदीतल्या थराराचा VIDEO )
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आजवर 54 हजारहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. या छोट्याशा व्हिडीओ क्लिपमध्ये एक महिला कुत्र्याची कशी गळाभेट घेते आणि तो कुत्रासुद्धा किती आनंदानं आपल्या मालकीणीला भेटतो, हे दिसतंय. या पोस्टला दिलेल्या कॅप्शननुसार (caption), हा कुत्रा हरवला होता आणि या महिलेला कुत्रा सापडल्याची माहिती मिळाली तेव्हा महिला आनंदून अगदी रडायला लागली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की महिलेनं कुत्र्याला कुशीत घेतल्यावर तो कसा अजिबातच तिला सोडायला तयार नाही.