JOIN US
मराठी बातम्या / Viral / हायवेवर झोपून काढत होते Naked Selfie, मागून आली पोलिसांची गाडी आणि..., VIDEO VIRAL

हायवेवर झोपून काढत होते Naked Selfie, मागून आली पोलिसांची गाडी आणि..., VIDEO VIRAL

सेल्फीचा नाद आला अंगाशी, एका फोटोसाठी काय केलं याचा VIDEO पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 09 ऑक्टोबर : सेल्फी काढण्यासाठी लोकं काय-काय करतील आणि कोणत्या स्थरावर जातील याचा काही नेम नाही. कोणतीही चांगली जागा दिसली की लगेचच तरुण-तरुणी कॅमेरा घेऊन सेल्फी काढण्यासाठी सज्ज होता. मग गड किल्ले असो समुद्र असो किंवा हायवे. असाच एका विचित्र प्रकार हैदराबादमधील हायवेवर घडला. इथं बांधण्यात आलेला दुरूगाम छेरुवू द्रुतगती मार्ग सध्या सेल्फी पॉइंट झाला आहे. येता जाता लोकं गाड्या थांबवून सेल्फी काढत असतात. अशा लोकांवर वचप बसावा म्हणून वाहतूक पोलिसांनी या पूलावर सीसीटीव्हीही लावले आहेत. 1 ऑक्टोबर रोजी दोन मुलं या पूलावर झोपून सेल्फी काढत होते. फोटो चांगले येण्यासाठी वेगवेगळ्या अॅंगलनं फोटो काढण्यासाठी या मुलांचा खटाटोप सुरू होता. मात्र यांना माहित नव्हते की, या सगळ्या प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा- धक्कादायक VIDEO! साखळी चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; बाईकवरून खेचलं आणि… सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलीस या मुलांचा प्रकार पाहत होते. त्यानंतर या मुलांना सरप्राइज देण्यासाठी पोलिसांची गाडीच त्यांच्यासमोर आली. पोलिसांनी या दोन्ही मुलांना अटक केली. वाचा- रस्ता क्रॉस करताना बाईकनं दिली धडक, फरफटत गेली महिला; अपघाताचा थरारक LIVE VIDEO

संबंधित बातम्या

वाचा- 2500 वर्षांपासून कॉफिनमध्ये बंद होता मृतहेद, शास्त्रज्ञांनी लोकांसमोरच उघडला या व्हिडीओमध्ये एक मुलगा झोपलेला आणि एक मुलगा त्याचा फोटो काढताना दिसत आहे. अचानक पोलिसांची गाडी आल्यानंतर त्यातील एक मुलगा पळून जातो, पोलीस त्याचा पाठलाग करून त्याला धरतात. पोलिसांनी नागरिकांना असे स्टंट करू नका असा इशारा दिला आहे मात्र तरी लोकं पूलावर गा़डी थांबवून फोटो काढत असतात. काही दिवसांपूर्वी, नागरी कार्यकर्ते साई तेजाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात एक जोडपं रस्त्याच्या मधून चालत होते. यानंतर पोलिसांनी आता पूलावर विनाकारण थांबणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या