Home /News /viral /

धक्कादायक VIDEO! साखळी चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; बाईकवरून खेचलं आणि...

धक्कादायक VIDEO! साखळी चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; बाईकवरून खेचलं आणि...

गुवाहाटीमध्ये दोन साखळी चोरांनी बाईकवरून वृद्ध महिलेची चेन चोरली. या चोरांनी महिलेचा गळा पडकला आणि तिला फरफटत घेऊन गेले.

  गुवाहाटी, 08 ऑक्टोबर : साखळी चोरांचे प्रमाण देशातील विविध शहरांमध्ये मोठया प्रमाणावर वाढले आहे. साखळी चोरांना पकडण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असले तरी, बाईकवरून पळून जाणाऱ्या या चोरांना पकडणे सोपे काम नाही. मात्र सोशल मीडियावर साखळी चोराचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. गुवाहाटीमध्ये दोन साखळी चोरांनी बाईकवरून वृद्ध महिलेची चेन चोरली. या चोरांनी महिलेचा गळा पडकला आणि तिला फरफटत घेऊन गेले. हा धक्कादायक व्हायरल व्हिडीओमध्ये महिला हवेत उडवताना दिसत आहे. रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. वाचा-रस्ता क्रॉस करताना बाईकनं दिली धडक, फरफटत गेली महिला; अपघाताचा थरारक LIVE VIDEO ज्या महिलेसोबत ही घटना घडली तिचे नाव कबीता दास असून त्या 68 वर्षांच्या आहेत. 16 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. चांदमारी भागात सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली, असे त्याच्या नातवाईकांनी सांगितले. वाचा-2500 वर्षांपासून कॉफिनमध्ये बंद होता मृतहेद, शास्त्रज्ञांनी लोकांसमोरच उघडला
  कबीता दास यांच्या कुटुंबियांनी एका लोकल मीडिया चॅनलला दिलेल्या माहितीनुसार कबीता दास यांच्या डोक्याच्या मागील बाजूस रक्तस्राव सुरू होत होता. हा प्रकार घडल्यानंतर कबीता काही दिवस धक्क्यात होत्या. वाचा-VIDEO: होंडा सिटीवर उलटला तांदळानं भरलेला कंटेनर, चालकाचा मृतदेहही मिळेना
  चांदमारी पोलीस स्टेशनमध्ये घटनेच्या दुसर्‍याच दिवशी तक्रार दाखल करण्यात आला होता आणि कबीता दास यांच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे की, अद्यापपर्यंत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Video viral

  पुढील बातम्या