जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्ता क्रॉस करताना बाईकनं दिली धडक, फरफटत गेली महिला; अपघाताचा थरारक LIVE VIDEO

रस्ता क्रॉस करताना बाईकनं दिली धडक, फरफटत गेली महिला; अपघाताचा थरारक LIVE VIDEO

रस्ता क्रॉस करताना बाईकनं दिली धडक, फरफटत गेली महिला; अपघाताचा थरारक LIVE VIDEO

रस्ता क्रॉस करत असताना एका महिलेला बाईक चालकानं धडक दिली, यात महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 08 ऑक्टोबर : अपघात कसा आणि कधी होईल काही सांगता येत नाही. बऱ्याचदा आपली चूक नसताना समोरच्या माणसाची घाई आपल्याला संकटात घेऊन जाते. असाच प्रकार पश्चिम बंगालमध्ये घडला. रस्ता क्रॉस करत असताना एका महिलेला बाईक चालकानं धडक दिली, यात महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील एगरा दीघा हायवेवर हा अपघात घडला. एक महिला रस्ता क्रॉस करत असताना समोरून एका बाईक चालक आला. बाईकनं महिलेला धडक दिल्यानंतर महिला फरफटत गेली. या भीषण अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. वाचा- 2500 वर्षांपासून कॉफिनमध्ये बंद होता मृतहेद, शास्त्रज्ञांनी लोकांसमोरच उघडला

जाहिरात

वाचा- बाई आवरा स्वत:ला!; डिस्काऊंटसाठी महिला न्यायाधीशांनी पोस्ट केले सेक्सी फोटो दरम्यान, या अपघातात बाईकस्वार आणि महिला दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या व्हिडीओमध्ये अपघात झाल्यानंतर लगेचच लोकांनी या दोघांना मदत करत त्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची तब्येत जास्त गंभीर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात