मिस्त्र, 08 ऑक्टोबर : इजिप्तमध्ये, पुरातत्वशास्त्रज्ञांनी (Archaeologists) थेट प्रेक्षकांसमोर एक प्राचीन मम्मीचे कॉफिन (Ancient Mummy Coffin) उघडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ग्लोबल न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार सुरूवातीस 59 सीलबंद थडगे सापडले. त्यातील एक प्रेक्षकांसमोर उघडण्यात आला. Saqqara हे इजिप्तमधील एक मोठे, प्राचीन दफनभूमी आहे जे मेम्फिसच्या प्राचीन शहराचे नेक्रोपोलिस म्हणून कार्य करते. इजिप्शियन पर्यटन व पुरातन वास्तू मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की Saqqara च्या पुरातत्व क्षेत्रात दफन विहिरींमध्ये 59 लाकडी शवपेटी सापडल्या आहेत. लाकडी शवपेटीची स्थिती चांगली असून त्यात इजिप्शियन पुजारी, समाजातील प्रतिष्ठित सदस्य आणि इतर ज्येष्ठ लोकांचे मृतदेह आहेत. दरम्यान हे सर्व मृतदेह 2500 वर्ष जुने असल्याचे सांगण्यात आले आहे. वाचा- VIDEO: होंडा सिटीवर उलटला तांदळानं भरलेला कंटेनर, चालकाचा मृतदेहही मिळेना
पर्यटन व पुरातन वास्तू मंत्रालयाने आयोजित केलेल्या अनसोल्डचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शवपेटीच्या आत एक मम्मी दिसत आहे, या मम्मीला दफन कपड्यात गुंडाळलेले असते. वाचा- VIDEO रेसिंग ट्रॅकवर राडा, रेस हरला म्हणून प्रतिस्पर्ध्यावर फेकून मारला बम्पर नॅशनल जिओग्राफिकच्या मते, ‘पॉप संस्कृती आणि लोकसाहित्याचा असा विश्वास आहे की मम्मीचा कबर उघडल्यामुळे मृत्यू होतो आणि शाप मिळतात’. यावेळी न्यूझीलंडचे राजदूतही उपस्थित होते.
Honoured to be invited by the Minister of Tourism and Antiquities HE Khaled El Anany to Saqqara for the announcement that a new tomb of mummies has been discovered. I saw one being opened for the first time in 2600 years! Truly amazing! @TourismandAntiq @MFATNZ 🇪🇬🇳🇿 pic.twitter.com/5oLfAM7zAV
— Ambassador Amy Laurenson 🇳🇿🇪🇬 (@NZinEgypt) October 3, 2020
वाचा- लेन बदलताना रस्त्यातच लागली गाडीला आग; खिडकी दरवाजे झाले जाम अखेर, पाहा VIDEO इजिप्शियन पर्यटन व पुरातन वास्तव्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार , सुरुवातीला Saqqara मध्ये 13 कबर तीन विहिरीत सापडल्या आणि त्यानंतर आणखी एक आणि 14 शेवपेट्या आढळून आल्या. अशा एकूण 59 शवपेट्या आढळून आल्या आहेत.