JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking! लाइव्ह रिपोर्टिंगवेळी श्वानाने रिपोर्टरला फरफटत नेलं; पाहा LIVE VIDEO

Shocking! लाइव्ह रिपोर्टिंगवेळी श्वानाने रिपोर्टरला फरफटत नेलं; पाहा LIVE VIDEO

श्वानासोबत रिपोर्टिंग करताना रिपोर्टरसोबत असं काही घडलं की पाहून धक्का बसेल पण हसूही आवरणार नाही.

जाहिरात

फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 जुलै : अनेकदा लाइव्ह रिपोर्टिंग करताना रिपोर्टरसोबत असं काही घडतं की ज्यामुळे फक्त आपणच आणि तर रिपोर्टरही शॉक होतो. सध्याच अशाच एक लाइव्ह रिपोर्टिंगचा व्हिडीओ व्हायरल  होतो आहे. ज्यात एक रिपोर्टर कुत्र्या ला घेऊन लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. त्यावेळी तिच्या कुत्र्याने तिच्यासोबत जे काही केलं ते खूप शॉकिंग होतं. ते संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. टिव्हीवर बातम्या पाहताना तुम्ही काही वेळा पाहिलं असेल रिपोर्टर किंवा अँकरसोबत काही तरी विचित्र घडतं आणि मग तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका महिला रिपोर्टरचा हा व्हिडीओ आहे. रिपोर्टर लाइव्ह शोवर लाइव्ह रिपोर्टिंग करत होती.  महिला रिपोर्टर एका कुत्र्याला सोबत घेऊन लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. सुरुवातीला बराच वेळ कुत्रा तिच्या बाजूला बसलेला आहे. त्याचवेळी ती रिपोर्टर हसत हसत लाईव्ह देते आहे. स्टुडिओतील अँकरशी संवाद साधताना दिसते आहे. त्याचवेळी कुत्रा तिच्यासोबत जे काही काही करतो ते पाहून आपल्याला सुरुवातीला धक्काच बसतो. VIRAL VIDEO - खेळता खेळता चिमुकल्याने पिटबुलच्या डोक्यात मारली बाटली; पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहूनच भरेल धडकी व्हिडीओत पाहू शकता, या रिपोर्टरच्या शेजारी बसलेला कुत्रा थोड्या वेळाने तिथून पळ काढतो. तो समोर कॅमेरमनच्या दिशेने पळत जातो. पण त्याच्या गळ्यातील दोरी रिपोर्टरच्या हातात आहे. रिपोर्टर लाइव्ह देण्यात दंग आहे, त्याचवेळी कुत्रा तिला आपल्यासोब खेचतच घेऊन जातो. माहितीनुसार या रिपोर्टरचं नाव कॅरोल किर्कवूड (Carol Kirkwood) आहे. ती बीबीसीमध्ये वेदर रिपोर्टसाठी काम करते. तिच्यासोबत असं काही घ़डण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीही तिने एका श्वानासोबत असंच लाइव्ह रिपोर्टिंग केलं होतं. त्यावेळीही तिला श्वानाने खेचलं होतं आणि ती जमिनीवर आडवी झाली होती. Viral News - पाळीव श्वानाचं सतत मालकिणीच्या ब्रेस्टवरच लक्ष; सत्य समजताच महिला हादरली कॅरलचा हा व्हिडिओ @BBCBreakfast ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या