नवी दिल्ली, 05 जुलै : पिटबुग डॉग च्या हल्ल्याच्या बऱ्याच बातम्या तुम्ही वाचल्या असतील, ऐकल्या असतील. व्हिडीओ पाहिले असतील. या खतरनाक श्वानाच्या हल्ल्यात काही जणांचा जीवही गेला आहे. अशाच श्वानाशी पंगा घेतला तो एका चिमुकल्याने. खेळता खेळता त्याने पिटबुलच्या डोक्यात बाटली मारली आणि त्यानंतर जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बऱ्याच लहान मुलांना कुत्रा-मांजर यांचं खूप आकर्षण असतं. असे प्राणी दिसले की त्यांना मिठी मारायला जातात किंवा काही जण त्यांची खोड करतात. हा मुलगाही अशीच एका कुत्र्याची खोड काढायला गेला. पण तो साधासुधा कुत्रा नव्हता तर पिटबुल डॉग होता. चिमुकल्याने हल्ला करताच तो चवताळला आणि त्याने जे केलं ते पाहूनच धडकी भरेल. Viral News - पाळीव श्वानाचं सतत मालकिणीच्या ब्रेस्टवरच लक्ष; सत्य समजताच महिला हादरली व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक पिटबुल डॉग आपल्या मालकाकडे तोंड करून उभा आहे. त्याच्यापासून काही अंतरावर एक लहान मुलगा पाण्याची बाटली हातात घेऊन आहे. सुरुवातीला तो ती बाटली हातात खेळवतो. त्यानंतर खेळत खेळत पिटबुलजवळ येतो. त्याच्या डोक्यात ती बाटली मारतो. सुरुवातीला पिटबुल काही करत नाही. म्हणून मुलगा पुन्हा बाटली मारतो. तेव्हा पिटबुल त्या मुलाकडे पाहतो. मुलगा पुन्हा बाटली मारतो. यावेळी मात्र पिटबुल चवताळतो आणि मुलावर हल्ला करायला जातो. मुलगाही घाबरतो आणि भीतीने पिटबुलपासून दूर पळून जातो. सुदैवाने कुत्र्याचा मालक त्याला अडवतो. त्याच्या गळ्यातील दोरी पकडून आपल्याकडे खेचतो. त्यामुळे तो मुलाचा पाठलाग करू शकला नाही आणि मुलगा त्याच्या हल्ल्यापासून वाचला. जर पिटबुलने मुलावर हल्ला केला असता, तर त्याचं काय झालं असतं, फक्त विचारानेच अंगावर काटा येतो. बिनडोक्याचा डॉग पाहून सर्वांना धक्का! पण VIRAL PHOTO मागील सत्य काही औरच; तुम्ही सांगू शकाल का? ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
Toddler hitting a pit bull in the head with a water bottle 😳 pic.twitter.com/JFAP2Lw317
— Crazy Clips (@crazyclipsonly) July 3, 2023
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.