लंडन, 04 जुलै : अनेकांना घरात श्वान पाळण्याची हौस असते. अशाच श्वान एका महिलेने पाळला होता. पण हा श्वान नेहमी तिच्या ब्रेस्टजवळ यायला पाहायचा. त्यामुळे महिलाही शॉक झाली. तिला श्वान विचित्र असल्याचं वाटलं. त्यानंतर तिला असं सत्य समजलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. यॉर्कशायरमधील हे प्रकरण आहे. क्लेअर चर्चिल असं या महिलेचं नाव आहे. 36 वर्षांची क्लेअरने एक श्वान दत्तक घेतला होता. हॉली असं त्याचं नाव. जॅक रसेल-चिहुआहुआ क्रॉस ब्रीडचा हा कुत्रा. पण त्याचं लक्ष सतत तिच्या ब्रेस्टकडे असायचं. तो त्याचा वास घ्यायचा. त्याला स्पर्श करत राहायचा. त्यांचं हे असं कृत्य पाहून तो श्वान काही क्लेअरला ठिक वाटला नाही. पण काही काळाने तो असं का करायचा, याचं कारण तिला समजलं. मालकासाठी श्वानाने जे केलं ते पाहून नेटकरी झाले अवाक; तुफान व्हायरल होतोय हा VIDEO क्लेअरने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. तेव्हा तिच्या ब्रेस्टमध्ये गाठ होती. तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं. हॉलीला याची आधीच माहिती झाली होती. म्हणूनच तो सतत तिच्या ब्रेस्टला स्पर्श करत होता. तिच्या कर्करोगाचं निदान वेळेत झालं आणि त्यावेळी वेळेवर तिच्यावर उपचार झाले. कुत्रा आणि मानव यांचे नाते खूप जवळचे आहे. आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून दोघेही एकमेकांना साथ देत आहेत. कुत्र्यांना जगातील सर्वात निष्ठावान प्राण्याचा टॅग मिळाला आहे. हे कुत्रे आपल्या मालकासाठी जीव देण्यासही मागे हटत नाहीत. अशी अनेक प्रकरणं तुम्हालाही माहिती असतील. Weird Job! फक्त कुत्रा सांभाळण्याची नोकरी, सॅलरी एक कोटी; पगारासह आणि बरंच काही… क्लेअरच्या बाबतीतही ते घडलं. आपल्या श्वानामुळे कॅन्सरपासून आपला जीव वाचल्याचं ती सांगते. यॉर्कशायर लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या कुत्र्याचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.