JOIN US
मराठी बातम्या / Viral / आईच्या मायेला तोड नाहीच! कुशीत घेऊन कुत्र्यानं भुकेल्या मांजराच्या पिल्लाला पाजलं दूध; VIDEO VIRAL

आईच्या मायेला तोड नाहीच! कुशीत घेऊन कुत्र्यानं भुकेल्या मांजराच्या पिल्लाला पाजलं दूध; VIDEO VIRAL

सध्या सोशल मीडियावर कुत्रा आणि मांजर यांच्यातील प्रेम दर्शवणारा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. असा व्हिडीओ तुम्ही कदाचित कधीच पाहिला नसेल.

जाहिरात

kitten network18 lokmat

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 25 जानेवारी : मांजर (cat) आणि कुत्रा (dog) तसं पाहायला गेलं तर एकमेकांचे शत्रू. चुकून एकमेकांच्या समोर आले तरी त्यांच्यामध्ये जुंपते. पण या मुक्या जीवांमध्येही आई आणि पिल्लांचं नातं या सगळ्या पलिकडे असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये कुत्रा आणि मांजर यांच्यातील आई-पिल्लाचं अनोखं नातं पाहायला मिळत आहे. चक्क एका कुत्रीनं मांजराच्या पिल्लासाठी पान्हा मोकळा करून दिला आहे. नायजेरियातील एका गावामधील (Nigerian village) ही घटना.  अवघ्या 32 सेकंदाचा हा व्हिडिओ असून, रॉयटर्स वृत्तसंस्थेनं (Reuters) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर तो पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाबू शकता,  रस्त्याकडेला शांतपणे एक कुत्री झोपली आहे. मांजराचं इवलसं पिल्लू तिचं दूध पित असल्याचं दिसत आहे. मांजराचं म्हणजे आपल्या हाडवैऱ्याचं पोर आपलं दूध पित आहे, हे बघूनही ती कुत्री शांतपणे पडून आहे. जणू त्या पिलाची ती आईच आहे. हे दृश्य बघणारे अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत, कौतुकानं हे अनोखे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद करताना दिसत आहेत. हे वाचा -  कबुतरांचा राजेशाही अंदाज; 7 बिघे जमीन, लाखोंचा बँक बॅलेन्स व सेवेसाठी नोकर-चाकर नेटिझन्सही हा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच अत्यंत वेगानं व्हायरल झाला असून, या व्हिडिओला 3 लाख 83 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 2 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि 463 पेक्षा जास्त जणांनी रिट्विट केला आहे.  त्यांनी या व्हिडिओवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. ‘हे खूप सुंदर आहे! निसर्ग सर्व शक्तीमान आहे, त्याच्यापुढे मानवानं खूप नम्र असलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे, असं एका युझरनं म्हटलं आहे, तर एकानं ‘या दोन्ही प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे, अशी कमेंट केली आहे. हे वाचा -  वाकड्यात शिरायचं नाय! छेड काढणाऱ्या मांजराला खेकड्यानं घडवली अद्दल; VIDEO VIRAL सोशल मीडियावर  कधी कोणत्या गोष्टींची चर्चा होईल आणि कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडिओ रडवतात सुद्धा. अनेकदा या व्हिडिओतून आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकायला  मिळतात. अशाच व्हिडीओपैकी हा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या