मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कबुतरांचा राजेशाही अंदाज; 7 बिघे जमीन, लाखोंचा बँक बॅलेन्स आणि सेवेसाठी नोकर-चाकर

कबुतरांचा राजेशाही अंदाज; 7 बिघे जमीन, लाखोंचा बँक बॅलेन्स आणि सेवेसाठी नोकर-चाकर

 41940100000447 हा आहे कबुतरांचा बँक खाते क्रमांक, कोणाही पाठवू शकतात पैसे..

41940100000447 हा आहे कबुतरांचा बँक खाते क्रमांक, कोणाही पाठवू शकतात पैसे..

41940100000447 हा आहे कबुतरांचा बँक खाते क्रमांक, कोणाही पाठवू शकतात पैसे..

  • Published by:  Meenal Gangurde
जयपूर, 24 जानेवारी : कोणी श्रीमंत आहे..कोट्यधीश आहे..कोणाच्या कंपनीचा टर्नओव्हर कोटींमध्ये..या सर्व गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र कोट्यवधी कबुतराबद्दल तुम्ही कधी ऐकलं का?? ही कहाणी आहे राजस्थानातील चित्तोडगडमधील बंबोरी गावातील. या गावात कोट्यवधी कबुताराचं वास्तव्य आहे. येथील कबुतरांची बँक खाती आहेत आणि त्यात लाखोंचा बॅलेन्सही आहे. सेवा करण्यासाठी नोकर-चाकर आहे. त्यांच्या नावावर 7 बिघा जमीन आहे. कबुतरखानादेखील तयार करण्यात आला आहे. येथे त्यांच्या गरजेच्या सर्व बाबींची काळजी घेतली जाते. इतकच नाही तर यासाठी कबुतरखाना समिती तयार करण्यात आली आहे. सरकारी बँकांमध्ये कबुतरांचं अकाऊंट कबुतरांसाठी बडोदा राजस्थान ग्रामीण बँकेतील बंबोरी ब्रांचमध्ये अकाऊंट सुरू करण्यात आलं आहे. अकाऊंट क्रमांक 41940100000447 आहे. लोक या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर करू शकतात. याशिवाय प्रत्येक मकरसंक्रातीला समितीचे पदाधिकारी आणि गावकरी कबुतरांसाठी डोनेशन एकत्र करतात आणि ती रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करतात. लोक रोख रक्कम किंवा गेहू, मकादेखील दान करतात. यंदा मकर संक्रांतीवर कबुतरांसाठी 1.72 लाख रुपये आणि 50 गोण्यात धान्य जमा केलं आहे. हे ही वाचा -देशातील पहिला Garbage Cafe; प्लास्टिक आणा आणि मोफत करा ब्रेकफास्ट, लंच..डिनर बंबोरी समाजसेवासाठी आहेत प्रसिद्ध कबुतरांशिवाय गावातील लोक समाजासाठीदेखील काम करतात. यंदाच्या वर्षी मकरसंक्रातीवर गावातील लोकांनी रक्तदान कॅम्प आयोजित केला होता, ज्यातून 117 युनिट रक्त डोनेट करण्यात आलं. इतकच नाही तर लोकांनी स्मशानात अंत्यसंस्कारासाठी लाकडांची अडचण जाणवू नये यासाटी 50 क्विंटर लाकड्यांची सोय केली. ज्यामुळे गरीब कुटुंबाना मदत करता येईल.
First published:

पुढील बातम्या