JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाकड्यात शिरायचं नाय! छेड काढणाऱ्या मांजराला खेकड्यानं कायमची घडवली अद्दल; VIDEO VIRAL

वाकड्यात शिरायचं नाय! छेड काढणाऱ्या मांजराला खेकड्यानं कायमची घडवली अद्दल; VIDEO VIRAL

एखाद्या उंदराला खेळवावं तसं ती खेकड्याला (Crab) खेळवण्याचा प्रयत्न मांजराला (Cat) चांगलाच महागात पडला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : मांजर (cat) आणि उंदराची (rat) लढाई तर सर्वांना माहितीच आहे. टॉम अँड जेरीच्या माध्यमातून त्यांची शत्रू कम मैत्री आपण सर्वांनी पाहिली आहे. उंदीरही मांजराला तिच्या कलेनं घेतो, त्यामुळे ती त्याला खेळवण्याचा पूरेपुर आनंद लुटते. असाच आनंद खेकड्यासोबतही (crab) लुटण्याचा प्रयत्न एका मांजरानं केला आणि मांजराला ते चांगलंच महागात पडलं आहे. खेकड्याच्या वाकड्यात शिरायला गेलेल्या मांजराला खेकड्यानं कायमची अद्दल घडवली आहे. हा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) झाला आहे. खेकडा आणि मांजराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  व्हिडीओत पाहू शकता. खेकडा शांतपणे बसला आहे. मांजर त्याला छेडण्याचा प्रयत्न करते.

संबंधित बातम्या

मांजर खेकड्याच्या नांग्यावर एकदा नाही, दोनदा नाही तर परत परत पंजा मारते. आपलं तोंडही त्याच्याजवळ नेते. खेकडा थोडा वेळ शांतच बसतो. पण मांजर काही शांत बसत नाही. खेकड्याच्या सहनशीलतेचा ती जास्त फायदा घेते आणि मग काय खेकड्याची सहनशीलता संपते आणि तो आक्रमक होतो. हे वाचा -  ‘लॉलीपॉप लागेलू’ वर विदेशी ठुमके, डान्सिंग डॅडचा आणखी एक VIDEO VIRAL मांजराला तो बघून बघून घेतो आणि जेव्हा ती पुन्हा त्याच्या नांग्यात आपला पंजा टाकते तेव्हा खेकडा जोरानं तिचा पकडतो. तेव्हा मात्र मांजर हवेतच उडते. खेकड्याच्या नांग्यात पंजा जाताच तिला वेदना होता आणि याच वेदनेनं ती उड्या मारायला लागते आणि आपला पंजा हलवते. मांजरीची अशी तडफड पाहून खेकडाही लगेच तिचा पंजा सोडतो. हे वाचा -  डरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO मांजराला खेकड्यानं कायमची अद्दल घडवली आहे. खरंतर या व्हिडीओतून माणसालाही खूप शिकण्यासारखं आहे.  कुणालाही मुद्दाम त्रास देणं खूप चुकीचं आहे आणि जर तुम्ही जाणूनबुजून कुणाच्या वाकड्यात शिरत असाल तर तुमची काय अवस्था होऊ शकते, हेच यातून दिसून येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या