नवी दिल्ली, 22 जानेवारी : 'लॉलीपॉप लागेलू' (Lipistick song) हे गाणं ऐकल्यानंतर कोणीही नाचायला सुरुवात करेल. 2011 मध्ये भोजपूरी गायक पवन सिंहने गायलेलेल्या या गाण्याने फक्त बिहारच नाही, तर भारतभर धुमाकूळ घातला. लग्न समारंभ- पार्ट्यांमध्ये या गाण्याची डिमांड खूप वाढली. गेल्या काही वर्षात या गाण्याची लोकप्रियता ऐवढी वाढली की, आता परदेशातील नागरिकांमध्येही या गाण्याची क्रेझ आहे. अशातच अमेरिकेतील एका डॅडचा या भोजपूरी गाण्यावर ठुमके लावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
भारतीय सेलिब्रिटी जेव्हा एखाद्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करतात, तेव्हा ते पाहायला सर्वांनाच आवडतं. पण एखाद्या परदेशी व्यक्तीचा ज्याला हिंदी देखील समजत नसेल, अशा व्यक्तीचा हिंदी बोलतानाचा किंवा हिंदी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. अशाच एका अमेरिकेतील व्यक्तीचा आपल्या मुलीसोबत भोजपूरी गाणं 'लॉलीपॉप लागेलू' गाण्यावर डान्स करतानाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध कंटेट क्रिएटर रिकी पाँड (Ricky Pond) यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर भोजपूरी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत या गाण्याप्रती आपलं प्रेम दाखवलं आहे. लॉलीपॉप लागेलू हे गाणं इंटरनेटवर चांगलंच लोकप्रिय आहे. हे गाणं वॉशिंग्टन येथील ग्राफिक्स डिझायनरपर्यंत पोहचलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रिकी आपल्या मुलीसोबत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघांनी भोजपूरी गाण्यावर लावलेले ठुमके सर्वांमध्ये चर्चेचा विषय असून त्यांच्या या व्हिडीओला चांगले व्ह्यूजही मिळत आहेत.
व्हिडीओमध्ये रिकी यांनी चेक्सचा शर्ट आणि त्याच्या मुलीने टी-शर्ट घातल्याचं पाहायला मिळतंय. गाणं सुरु होताच दोघेही ज्या पद्धतीने डान्स करतात, त्यांच्या डान्स करण्याच्या स्टेप्स सर्वांनाच आवडत आहेत. त्यांनी बॉलिवूड स्टाईलने हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. या डान्सिंग डॅडचे सोशल मीडियावर वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
रिकी पॉन्ड यांचं हिंदी, भोजपूरी, पंजाबी आणि दाक्षिणात्य गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ असून, ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. हिंदीतील अनेक सुपरहिट गाण्यावर देखील त्यांनी डान्स केला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या प्रत्येक व्हिडीओला अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळतात. तसंच भरभरून कमेंट्स करत अनेक युजर्सनी त्यांच्या डान्सचं कौतुकही केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral