मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील आहे. तिथल्या बांधवगढ टायगर रिझर्व्हमधील हा वाघ. एका गाडीत सुरुवातीला हा वाघ बसलेला आहे. हळूहळू तो गाडीबाहेर येतो आणि डरकाळी देण्यासाठी आपलं तोंड उघडतो. त्याचवेळी त्याच्या तोंडातून धूरच धूर बाहेर पडताना दिसतो. हे वाचा - कुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL एखाद्या माणसानं स्मोकिंग करावं आणि त्याच्या तोंडातून धूर यावा तसाच धूर या वाघाच्या तोंडातूनही बाहेर पडतो आहे. पण या वाघाच्या तोंडातील धूर हा धूम्रपानाचा नाही तर थंडीचा आहे. जास्त थंडी असेल तर तोंडातून बोलताना माणसाच्या तोंडातूनही अशाच वाफा बाहेर पडतात. इतका वेळ गाडीत राहिलेला हा वाघ गाडीबाहेर पडताच त्यानं आपलं तोंड उघडलं आणि थंडीच्या वाफा त्याच्या तोंडातून बाहेर पडल्या. हा व्हिडीओ पाहून तिथं किती थंडी असावी याचा अंदाजा आपल्याला येऊच शकतो. हे वाचा - कुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL वाघाच्या तोंडातून धूर येण्याचं कारण काहीही असो. पण असा धूर ओकणारा वाघ मात्र नेटिझन्सना खूपच आवडला आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.Is this tigress from Bandhavgarh smoking. @BandhavgarhTig2 pic.twitter.com/r8CWL6Mbwi
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) January 19, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Tiger, Viral