JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / युझवेंद्र चहल सोबत प्रवास करणाऱ्या या सुंदर मुलीला ओळखलंत का?

युझवेंद्र चहल सोबत प्रवास करणाऱ्या या सुंदर मुलीला ओळखलंत का?

भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी इंदूर येथे रवाना होत असताना या प्रवासा दरम्यानचे काही फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : भारतीय संघ मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळणार आहे. यापूर्वीचे दोनही सामने भारताने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना नावावर करून मालिका विजय प्राप्त करण्याच्या तयारीत सध्या भारतीय संघ आहे. भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी इंदूर येथे पोहोचला असून तेथील होलकर स्टेडियमवर हा सामना पारपडले.   हे ही वाचा  : IND vs NZ 3rd ODI: पंत लवकर बरा होऊ दे! टीम इंडियाचं महाकालेश्वर मंदिरात देवाला साकडं भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी इंदूर येथे रवाना होत असताना या प्रवासा दरम्यानचे  काही फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर इंदूरला जात असतानाचा सहकारी कुलदीप यादवचा एक मजेदार फोटो पोस्ट केला. हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला वाटेल ही कोण सुंदर मुलगी आहे? परंतु ही मुलगी नसून तो क्रिकेटपटू कुलदीप यादव आहे.

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे दोन्ही फिरकीपटू जवळचे मित्र आहेत आणि रविवारी चहलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील एका फिल्टरचा वापर करून कुलदीपचे रुपांतर एका महिलेत केले.

या फोटोमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अनेक मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.  चहलने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करून त्याला “ट्रॅव्हल पार्टनर” असे कॅप्शन दिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या