advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs NZ 3rd ODI: पंत लवकर बरा होऊ दे! टीम इंडियाचं महाकालेश्वर मंदिरात देवाला साकडं

IND vs NZ 3rd ODI: पंत लवकर बरा होऊ दे! टीम इंडियाचं महाकालेश्वर मंदिरात देवाला साकडं

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दोन सामने खेळवले गेले असून यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत 2-0 ने आघाडी मिळवली आहे. अशातच न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा सामना हा मध्यप्रदेश मधील होलकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

01
 मंगळवारी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ मध्यप्रदेशातील उज्जैन येथे दाखल झाला आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघातील काही सदस्यांनी सोमवारी सकाळी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजा केली. सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू सोमवारी सकाळी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्मचाऱ्यांसह महाकाल मंदिरात पोहोचले.

02
 भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आपण देवाकडे  रिकव्हरीसाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. 30 डिसेंबर रोजी भारताचा युवा स्टार क्रिकेटर  झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातातून सावरून  करण्यास काहीसा वेळ लागू शकतो अशी माहिती मिळत आहे.

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आपण देवाकडे रिषभ पंतच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. 30 डिसेंबर रोजी भारताचा युवा स्टार क्रिकेटर रिषभ पंत याचा भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातातून सावरून रिषभला पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास काहीसा वेळ लागू शकतो अशी माहिती मिळत आहे.

advertisement
03
 सूर्यकुमार म्हणाला, "आम्ही  यासाठी प्रार्थना केली. त्याचे पुनरागमन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली आहे, आता त्यांच्याविरुद्धच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहोत" .

सूर्यकुमार म्हणाला, "आम्ही ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. त्याचे पुनरागमन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली आहे, आता त्यांच्याविरुद्धच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहोत" .

advertisement
04
 महाकालेश्वर मंदिरात पहाटेच्या वेळी होणाऱ्या भगवान शंकराच्या 'भस्म आरती' मध्ये  आणि कर्मचारीही सहभागी झाले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्मचार्‍यांसोबत पोझ देताना खेळाडूंनी पारंपरिक पोशाख - धोतर आणि अंगवस्त्र परिधान केले होते.

महाकालेश्वर मंदिरात पहाटेच्या वेळी होणाऱ्या भगवान शंकराच्या 'भस्म आरती' मध्ये भारतीय संघातील खेळाडू आणि कर्मचारीही सहभागी झाले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्मचार्‍यांसोबत पोझ देताना खेळाडूंनी पारंपरिक पोशाख - धोतर आणि अंगवस्त्र परिधान केले होते.

  • FIRST PUBLISHED :
  •  मंगळवारी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ मध्यप्रदेशातील उज्जैन येथे दाखल झाला आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघातील काही सदस्यांनी सोमवारी सकाळी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजा केली. सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू सोमवारी सकाळी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्मचाऱ्यांसह महाकाल मंदिरात पोहोचले.

    MORE
    GALLERIES