विराटचं बर्थडे सेलिब्रेशन
मेलबर्न, 05 नोव्हेंबर: टीम इंडिया रविवावी टी20 वर्ल्ड कप मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सुपर 12 फेरीचा शेवटचा सामना खेळाणार आहे. हा सामना मेलबर्न इथे होणार आहे. टीम इंडिया सध्या ग्रुप 1 मध्ये सेमी फायनलच्या उंबरठ्यावर उभी आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकताच भारतासाठी सेमी फायनलची दारं खुली होतील. आणि टीम इंडियासाठी माजी कर्णधार विराट कोहली वाढदिवसाचं हे स्पेशल गिफ्ट देता येईल. दरम्यान विराट कोहलीनं आज आपला 34वा वाढदिवस साजरा केला. मेलबर्नमध्ये टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा झाला. प्रॅक्टिसआधी केक कटिंग झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियानं आज मेलबर्नमध्ये सराव केला. पण सराव सत्राला सुरुवात करण्याआधी विराटनं वाढदिवसाचा केक कापला. पण यावेळी ड्रेसिंग रुममधली एक खास व्यक्ती उपस्थित होती. ज्यांना विराटचा ट्रबलशूटरही म्हटलं जातं आणि त्यांचाही आज वाढदिवस आहे. दोघांनी यावेळी केक कापला आणि एकमेकांचं तोंड गोड केलं. त्यानंतर रिषभ पंत आणि इतर खेळाडूंनी दोघांना केक भरवला. यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बॅटिंग कोच विक्रम राठोडही उपस्थित होते.
कोण आहे ती खास व्यक्ती? विराटसोबत आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आहेत भारतीय संघाचे स्ट्रेथ अँड कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन. 5 नोव्हेंबरला त्यांचाही वाढदिवस असतो. पॅडी अप्टन नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच बनले आहेत. 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघासोबतही ते होते. त्यावेळी गॅरी कर्स्टन संघाचे प्रशिक्षक होते. दरम्यान विराटचा हरवलेला फॉर्म परत आणण्यात पॅडी अप्टन यांची मोलाची भूमिका आहे. आशिया कपपूर्वी पॅडी यांनी कोहलीसोबत बराच वेळ घालवला होता. त्याचा त्याला बराच फायदा झाला.
आशिया कपमधून विराटनं आपला हरवलेला फॉर्म पुन्हा मिळवला. टी20 वर्ल्ड कपममध्येही विराटची जादू सुरुच आहे आणि भारतानं सेमी फायनल गाठली तर त्याचं मोठं श्रेय विराटलाच जाईल.
झिम्बाब्वेविरुद्ध निर्णायक लढत टीम इंडिया रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध महत्वाची आणि निर्णायक लढत होणार आहे. झिम्बाब्वेचं पारडं टीम इंडियाच्या तुलनेत जड नसलं तरी याच टीमनं पाकिस्तानसारख्या टीमला हरवलं होतं. त्यामुळे झिम्बाव्वेला कमी लेखून चालणार नाही. पण याही सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.