न्यूझीलंड दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाचं सिलेक्शन
मुंबई, 31 ऑक्टोबर: टीम इंडियाची नजर सध्या टी20 वर्ल्ड कपवर आहे. तीन पैकी 2 सामने जिंकून टीम इंडिया सध्या सेमी फायनलच्या उंबरठ्यावर आहे. सुपर 12 फेरीत भारताचे अजून दोन सामने बाकी आहेत. पण याच दरम्यान बीसीसीआय एका वेगळ्या तयारीला लागली आहे. कारण वर्ल्ड कप संपताच लगेच पाच दिवसांनी टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीकडून आज टीम जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. चेतन शर्मा करणार टीमची घोषणा बीसीसीआयचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा आजच भारतीय संघाची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. टीम इंडियाच्या या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ 3 टी20 आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. दरम्यान टी20 वर्ल्ड कपची फायनल 13 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 18 नोव्हेंबरला न्यूझीलंड दौऱ्यातील पहिली टी20 खेळवली जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. हेही वाचा - Ind vs SA: बॉलर म्हणतोय नाही… पण कार्तिकचा हट्ट… रोहितनं घेतला रिव्ह्यू, पाहा मग काय घडलं? असा असेल भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबर, पहिली टी20 - वेलिंग्टन 20 नोव्हेंबर, दुसरी टी20 - माऊंट माँगानुई 22 नोव्हेंबर, तिसरी टी20 - नेपियर वन डे मालिका 25 नोव्हेंबर, पहिली वन डे - ऑकलंड 27 नोव्हेंबर, दुसरी वन डे - हॅमिल्टन 30 नोव्हेंबर, तिसरी वन डे - ख्राईस्टचर्च हेही वाचा - Ind vs SA: टीम इंडिया हरली आता पाकिस्तानचं काय होणार? पॉईंट टेबलमध्ये झालाय मोठा उलटफेर वर्ल्ड कपमध्ये भारत-न्यूझीलंड भिडणार? दरम्यान यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड वेगवेगळ्या गटात आहेत. पण सेमी फायनलमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडनं आपले तीनपैकी दोन सामने जिंकून ग्रुप 1 च्या पॉईंट टेबलमध्ये आपलं स्थान भक्कम केलं आहे. तर भारत ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाला बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध होणारे हे सामने जिंकून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील.