वर्ल्ड कप संघांचे कर्णधार
मुंबई, 15 ऑक्टोबर: आयसीसीच्या प्रतिष्ठित टी20 वर्ल्ड कपला रविवार (16 ऑक्टोबर) पासून सुरुवात होत आहे. कांगारुंच्या देशात अर्थात ऑस्ट्रेलियामध्ये 29 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत यंदा 16 टीम्स सहभागी होणार आहेत. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 45 सामने खेळवले जाणार असून ते ऑस्ट्रेलियातल्ये वेगवेगळ्या 7 स्टेडियम्समध्ये पार पडणार आहेत. दरम्यान श्रीलंका आणि नामिबिया यांच्यातल्या ग्रुप स्टेजमधील सामन्यानं स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. मेलबर्नमधल्या गीलॉन्ग मध्ये होणारा हा सामना रविवारी सकाळी भारतीय वेळेनुसार 9.30 वाजता सुरु होईल. भारताची सलामी पाकिस्तानशी या स्पर्धेतला सर्वात मोठा हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे तो रविवार 23 ऑक्टोबर यादिवशी. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी सुपर-12 फेरीत आमनेसामने येणार आहेत. उभय संघांसाठी हा सलामीचा सामना असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान ग्रुप स्टेजमधील सामने 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरदरम्यान पार पडतील. तर सुपर -12 फेरीचे सामने 22 ऑक्टोबरला होणार आहेत. आणि स्पर्धेची मेगा फायनल 13 नोव्हेंबरला होईल. ग्रुप स्टेजचे सामने सकाळी 9.30 आणि दुपारी 1.30 वाजता खेळवले जातील.
टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे सामने 23 ऑक्टोबर 2022 भारत वि. पाकिस्तान, सुपर 12 मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 1.30 वा. 27 ऑक्टोबर 2022 भारत वि. ग्रुप स्टेजमधील पात्र संघ, सुपर 12 सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 12.30 वा. 30 ऑक्टोबर 2022 भारत वि. दक्षिण आफ्रिका, सुपर 12 पर्थ स्टेडियम, दुपारी 4.30 वा. 02 नोव्हेंबर 2022 भारत वि. बांगलादेश, सुपर 12 अॅडलेड ओव्हल, दुपारी 1.30 वा., 06 नोव्हेंबर 2022 भारत वि. ग्रुप स्टेजमधील पात्र संघ, सुपर 12 मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 1.30 वा. हेही वाचा - Womens Asia Cup: आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा, हरमनप्रीतच्या टीम इंडियानं केला हा ‘भीमपराक्रम’ थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात संपूर्ण टी20 वर्ल्ड कपचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवरुन केलं जाणार आहे. तर डिस्ने हॉटस्टारवर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाईल.
वर्ल्ड कपपूर्वी कॅप्टन्स एकत्र दरम्यान टी20 वर्ल्ड कपच्या एक दिवस आधी 16 संघांचे कर्णधार आज पत्रकार परिषदेसाठी एकत्र आले होते. यावेळी खास फोटोशूट पार पडलं. इतकच नव्हे तर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला.