JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup : South Africa सगळ्यात दुबळी टीम, ग्रुप ऑफ डेथमध्ये उलटफेर करणार?

T20 World Cup : South Africa सगळ्यात दुबळी टीम, ग्रुप ऑफ डेथमध्ये उलटफेर करणार?

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्याच टीम धोकादायक वाटत असल्या तरी दक्षिण आफ्रिकेची (South Africa) टीम मात्र याला अपवाद आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्याच टीम धोकादायक वाटत असल्या तरी दक्षिण आफ्रिकेची (South Africa) टीम मात्र याला अपवाद आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेची ही टीम सगळ्यात दुबळी असल्याचं मत अनेक क्रीडा समिक्षक आणि माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. आयसीसी क्रमवारीमुळे दक्षिण आफ्रिकेची टीम आधीच सुपर-12 मध्ये पोहोचली असली तरी त्यांचा ग्रुप हा ग्रुप ऑफ डेथ असल्याचं दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रुपमध्ये तगडी वेस्ट इंडिज , इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमला सेमी फायनल गाठणंही कठीण दिसत आहे. आतापर्यंत 7 वेळा टी-20 वर्ल्ड कप खेळवले गेले, पण एकदाही दक्षिण आफ्रिकेला ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं नाही. यावेळी दक्षिण आफ्रिकेची टीम टेंबा बऊमाच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम (South Africa Squad) टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), बजोर्न फॉर्टयूइन,रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडिन मार्कराम, डेविड मिलर, डब्ल्यू मुल्डर, लुंगी नगिदी, एनरिख नॉर्खिया, ड्वायन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डर डुसैन | राखीव: जॉर्जी लिंडे, एंडिले फेहुलक्वायो, लिजाड विलियम्स दक्षिण आफ्रिकेचं वेळापत्रक (South Africa Time Table) 23 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया- दुपारी 3.30 वाजता 26 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज- दुपारी 3.30 वाजता 30 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका- दुपारी 3.30 वाजता 2 नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश- दुपारी 3.30 वाजता 6 नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड- संध्याकाळी 7.30 वाजता ग्रुप-1 मधल्या टीम वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया श्रीलंका बांगलादेश ग्रुप-2 मधल्या टीम भारत पाकिस्तान न्यूझीलंड अफगाणिस्तान स्कॉटलंड नामिबिया

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या